धक्कादायक ! शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 08:59 IST2020-07-08T08:58:50+5:302020-07-08T08:59:39+5:30
शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

धक्कादायक ! शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू
औरंगाबाद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. २५ जून रोजी त्यांना घाटी रुग्णालयातून या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल झाल्यापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचार सुरू असताना त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. कोविड विथ मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णलयाच्या प्रशासनाने सांगितले.