संतापजनक ! माथेफिरूने तबेला पेटविल्याने घोड्याचा तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:18 IST2020-12-28T12:15:10+5:302020-12-28T12:18:10+5:30

विजयकुमार रामदास सरोदे (रा. बळीराम पाटील शाळेजवळ) यांच्या मालकीचा हा तबेला आहे.

Annoying! Horse suffers death after being set on fire by unknown | संतापजनक ! माथेफिरूने तबेला पेटविल्याने घोड्याचा तडफडून मृत्यू

संतापजनक ! माथेफिरूने तबेला पेटविल्याने घोड्याचा तडफडून मृत्यू

ठळक मुद्देसिडको ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद: जाधववाडी मोंढा परिसरातील स्मशानभूमीलगतच्या तबेल्यास अज्ञात माथेफिरूने आग लावल्याने आतील घोड्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सिडको पोलीस ठाण्यात याविषयी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विजयकुमार रामदास सरोदे (रा. बळीराम पाटील शाळेजवळ) यांच्या मालकीचा हा तबेला आहे. काकाचे तेरावे असल्याने ते कालिकामाता मंदिरात स्वयंपाकाच्या कामात व्यस्त होते. तबेल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा सकाळी फोन आला की, तुमचा घोडा पूर्ण काळा झालेला असून, तो जमिनीवर पडलेला आहे. त्यामुळे विजयकुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुणी तरी आग लावून घोडा व तबेला जाळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे, प्रविण पाटील, पोहेकॉ गोरखनाथ पवार आदीची टीमने घटनास्थळी जावून पाहणी केली.

वीज पुरवठा बंद..
घटनास्थळी वीजपुरवठा खंडित असल्याने येथे अंधार असतो. कुणी तरी तबेल्याला आग लावल्याचा कयास आहे. सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरू विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ गोरखनाथ पवार करीत आहेत.

Web Title: Annoying! Horse suffers death after being set on fire by unknown