शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

संतापजनक ! मदतीच्या बहाण्याने मध्यप्रदेशच्या मजूर महिलेवर ठेकेदाराचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 2:49 PM

गरजू दांपत्याला मदत करीत त्यांच्यासोबत जवळीक साधली. पिडितेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत पाच दिवस अत्याचार केला.

ठळक मुद्देमदतीच्या बहाण्याने जवळीक साधून केला अत्याचारतुळसी बिल्ड्कॉन येथे आरोपी ठेकेदारी करीत असे

औरंगाबाद: कामधंद्याच्या शोधात औरंगाबादला आलेल्या मध्यप्रदेशातील मजूराच्या पत्नीवर ठेकेदाराने अत्याचार केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी समोर आली. याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन एमआयडिसी सिडको पोलीस ठाण्यात नराधम ठेकेदारावर गुन्हा नोंदविला. 

मधूसूदन सरकार( रा.पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव असून तो त्याच्या राज्यात पळून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना समजली. प्राप्त माहिती अशी की,  मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील दांपत्य लॉकडाउन समाप्तीनंतर (दोन महिन्यापूर्वी ) औरंगाबादला आले. कामाचा शोध घेत असताना चिकलठाणा एमआयडीसीतील एका बांधकाम साईटवर हे दांपत्य गेले. तेथे त्यांना आरोपी ठेकेदार भेटला. तेव्हा त्याची नजर मजूराच्या ३० वर्षीय पत्नीवर पडली. त्याने या दांपत्याला काम दिले. ऐवढेच नव्हे तर नारेगांव येथे खोली किरायाने घेऊन दिली. 

यानंतर अधूनमधून तो या दांपत्याच्या घरी जाऊ लागला. ५ ते १०  सप्टेंबरदरम्यान महिलेचा मजूर पती कामावर आल्यावर आरोपी मधूसूदन त्याच्या घरी जात असे. पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार केला. हा प्रकार पिडितेने तिच्या पतीला सांगितला. यानंतर त्याने तिला धीर दिला आणि आरोपी ठेकेदाराविरूध्द पोलिसांत तक्रार करण्याची तयारी दर्शविली. 

दरम्यान, ही कुणकुण नराधमाला लागताच तो पळून गेला.  पडितेने १५ ऑगस्ट रोजी आरोपी मधूसूदन सरकारविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची  तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड या गुंह्याचा तपास करीत आहेत. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती उपनिरिक्षक लाड यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादLabourकामगार