शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी घोषणा १३ हजार कोटींची, मिळाले हजार कोटी; १२ सिंचन प्रकल्प अपूर्णच

By बापू सोळुंके | Updated: August 23, 2025 16:09 IST

मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले १२ सिंचन प्रकल्प दोन वर्षांनंतरही कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपूर्वी सन २०२३ मध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत सुमारे १३ हजार ५६२ कोटी ३३ लाख रुपयांच्या १२ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली होती. या प्रकल्पांच्या कामांवर मागील दोन वर्षांत तब्बल १ हजार १ कोटी १८ लाख रुपये खर्च झाला आहे. असे असले तरी दोन वर्षांत एकही प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने सिंचन कागदावरच असल्याचे दिसून येते.

प्राप्त माहितीनुसार मराठवाड्याची सिंचन क्षमता वाढावी. मराठवाडापाणीदार व्हावा, यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १६ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात झाली होती. या बैठकीत मराठवाड्यासाठी १२ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. याकरिता १३ हजार ५६२ कोटी ३३ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीमुळे अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित सिंचन प्रकल्पांना चालना मिळाली. या कामांवर मागील दोन वर्षांत जून अखेरपर्यंत १ हजार १ कोटी १८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अनेक कामांना केवळ सुरुवात झाली आहे.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पसुधारित प्रशासकीय मंजुरी- ७ हजार ६५४ कोटी ६४ लाख रुपयेकिती खर्च झाला?- ४३२ कोटी ६९ लाख रुपयेकाय कामे केली? - दोन वर्षात प्रकल्पांतर्गत पांगरा, गोजेगाव, बनचिंचोली, घारापूर, किनवट आणि धनोडा या सहा बंधाऱ्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मारेगाव बंधाऱ्याची निविदा काढणे बाकी आहे.----------------------

बाभळी मध्यम प्रकल्पसुधारित प्रशासकीय मंजुरी- ७७१कोटी १० लाखकिती खर्च झाला? - ५कोटी ७ लाखकाय कामे केली? - प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील ३ पैकी २ पुलांची कामे पूर्ण. बंधाऱ्याच्या सुधारित ऊर्जा व्यय व्यवस्थेच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश जारी.------------------------------------------

उनकेश्वर उच्चस्तर बंधारासुधारित प्रशासकीय मान्यता- २३२कोटी ७१ लाखआतापर्यंत खर्च- १०कोटी २१ लाखकाय कामे केली? - बंधाऱ्याच्या डाव्या बाजूच्या विभाजक भिंतीचे काम पूर्ण केले. प्रस्तंभ १ ते १४चे काम प्रगतिपथावर. तर १४ ते १९ साठी पायाचे खोदकाम पूर्ण करण्यात आले.----------------------------

पोटा उच्च बंधाराप्रशासकीय मंजुरी- २३७ कोटी २० लाखआतापर्यंत खर्च- १ कोटी ९४ लाखकाय कामे केली?- बंधाऱ्याच्या कामास सुरुवात. पोहच रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू-----------------------------

परळी उच्च बंधाराप्रशासकीय मंजुरी- २३६ कोटी ५१ लाखआतापर्यंत खर्च- २३ कोटी १५ लाखकाय कामे केली?- बंधाऱ्याच्या कामास सुरुवात. पोहच रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया प्रगतिपथावर----------------------------------------

ममदापूर उच्च बंधाराप्रशासकीय मंजुरी -२७ कोटी ५८ लाखआतापर्यंत खर्च - ८ कोटी रुपयेकाय कामे केली? - बंधाऱ्याच्या कामास सुरुवात. पोहच रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया प्रगतिपथावर----------------------------------

पिंपळगाव कुटे बंधाराप्रशासकीय मंजुरी - २६६ कोटी १२ लाखआतापर्यंत खर्च- ६ कोटी ३१ लाखकाय कामे केली? बंधाऱ्याच्या कामास सुरुवात. पोहच रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया प्रगतिपथावर----------------------------------------------

निम्न दुधना प्रकल्पप्रशासकीय मंजुरी - ३०७० कोटी ५२ लाखआतापर्यंत खर्च- ५८ कोटी ८१ लाखकाय कामे केली?- मुख्य कालवा व वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण. लाभक्षेत्र विकास क्षेत्रातील घटक कामे अंतिम करण्यात आली. ५३ हजार ३७९ हेक्टरपैकी ५३,०५०हेक्टरमधील कामे पूर्ण. उर्वरित क्षेत्राची कामे वगळणार------------------

जायकवाडी प्रकल्प टप्पा -२प्रशासकीय मंजुरी- ५३७ कोटी ६१ लाखआतापर्यंत खर्च- ३९२ कोटी २१ लाखकाय कामे केली?- पैठण उजवा कालवा ० ते १३२ किमीमधील वहन क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी अस्तरीकरणाची कामे हाती घेण्यात आली. यापैकी १०० किमीचे काम पूर्ण. उर्वरित कामे प्रगतिपथावर.-------------------

वाकोद मध्यम प्रकल्पप्रशासकीय मंजुरी- २७५ कोटी १ लाखआतापर्यंत खर्च- ६३ कोटी ८ लाखकाय कामे केली?-प्रकल्पांतर्गत गिरजा-वाकोद जोड कालवा (बंद नलिकेद्वारे) चे काम ९० टक्के पूर्ण. पिंपळगाव वळण येथे कोल्हापुरी बंधारा आणि संरक्षक भिंत बांधकाम प्रगतिपथावर.----------------------------------------------

अंबड प्रवाही वळण योजना (नाशिक)मराठवाड्याच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी १० कोटी ३३ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरीआतापर्यंत खर्च ३३ लाख रुपयेकाय कामे केली?- या योजनेतून ०.९१ दलघमी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. ७ कोटी २ लाख रुपयांची निविदा प्राप्त. भूसंपादन प्रक्रिया प्रगतिपथावर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीMarathwadaमराठवाडा