शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विहिरीत अनमोल ‘खजिना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:47 AM

गारगोटी दगडांची तस्करी : खोदकाम करताना आढळला मौल्यवान साठा

विनोद जाधवलासूर स्टेशन : कधी कोणत्या वस्तूला किती महत्त्व येईल, हे सांगता येत नाही. असाच काहीसा गंभीर प्रकार गंगापूर तालुक्यातील वसूसायगाव येथे उघडकीस आला.वसूसायगाव शिवारातील एका विहिरीतून तब्बल ७० ते ८० लाख रूपयांच्या गारगोटी दगडाची (रंगीबेरंगी) तस्करी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धंद्यात सहभागी करून घेतले नाही म्हणून गारगोटी दगडाचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाºयाने या गोरखधंद्यांचा भंडाफोड केला. २०१३ पासून हा धंदा बिनदिक्कत सुरू असल्याचे बोलले जात आहे, हे विशेष.लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या वसूसायगाव येथे एका विहिरीचे २०१३ मध्ये खोदकाम सुरू करण्यात आले होते. ३० फूट खोदल्यावर आकर्षक गारगोटी दगड दिसून आला. गारगोटीच्या दिशेने आडवे खोदकाम करून त्यातून आतापर्यंत जवळपास ८० लाख रूपयांचा गारगोटी दगडाची तस्करी करण्यात आल्याची माहिती अजिंठा येथील पठाण नामक व्यापाºयाने दिली. गौण खनिज कायद्यानुसार परवानगी घेऊनच या दगडांची वाहतूक करता येते. परंतु एवढे दिवस कुणाच्या आशीर्वादाने ही तस्करी सुरु होती, याचा शोध घेणेही गरजेचे आहे. जवळपास पाच वर्षांत शासनाचा किती महसूल बुडाला, याचाही तपास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच हाती घ्यावा, म्हणजे सत्य परिस्थिती समोर येईल.संबंधित शेतकºयाला एका दिवसाच्या खोदकामातून मिळालेल्या दगडाच्या मोबदल्यात दहा हजार रुपये दिले जात होते. तर संबंधित तस्कर ते अनमोल दगड पर्यटनस्थळी किंवा विदेशी पर्यटकांना विकून चार ते पाच लाख रुपयांची कमाई करीत असत. सुरू असलेले काम मध्यंतरी विहिरीला पाणी असल्याने बंद ठेवण्यात आले होते. तसेच तस्करीत बेबनाव झाल्याने या विहिरीत काहींनी अ‍ॅसिड टाकून गारगोटी नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.अगेट दगडांप्रमाणे ‘मॉस स्टोन’ हा दगड हिरवट-पाळपट रंगाचा असतो. दगडावर शेवाळ पकडावं असं या दगडाचं देखणं स्वरुप असतं. घराच्या भिंती किंवा सजावटीसाठी या दगडाला खूप मागणी असते. मातीत सापडणाºया काही दगडांना परदेशात कोट्यवधी रूपयांचे मोल आहे. कोट्यवधी रूपयांच्या मोबदल्यात ही खनिज संपत्ती सरकारी परवानग्यांशिवाय परदेशात तस्करीच्या माध्यमातून पाठविली जात असण्याची शक्यता आहे.पर्यटनस्थळी या दगडांचे मोलनिसर्गत: पांढºया आणि हिरव्या रंगाची चकाकी असलेले हे खडे परदेशात कोट्यवधी रुपयांना विकले जाताता. अजिंठा लेणी, वेरुळ व पर्यटनस्थळी व्यवसाय करणाºयांनाच या दगडांचे मोल माहित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दगड वाटणारे हे खडे या व्यावसायिकांसाठी अनमोल खजिनाच आहेत.पंचनामे करण्याचे आदेशआमच्या कार्यालयाच्या वतीने यासंबंधी कोणालाही परवानगी दिलेली नाही. तसेच संबंधित तलाठ्याला पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Natureनिसर्ग