अंजली दमानिया यांचे 1 लाख 73 हजारांचे घड्याळ चोरट्यांनी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:45 IST2019-06-05T17:41:56+5:302019-06-05T17:45:54+5:30

हॉटेलच्या रूममधून घड्याळ चोरीस गेले

Anjali Damania's 1 million 73 thousand cost watche were stolen by thieves | अंजली दमानिया यांचे 1 लाख 73 हजारांचे घड्याळ चोरट्यांनी पळविले

अंजली दमानिया यांचे 1 लाख 73 हजारांचे घड्याळ चोरट्यांनी पळविले

औरंगाबाद: मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची  तब्बल 1 लाख 73 हजार रुपये किंमतीची मनगटी घड्याळ चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 4 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या सुमारास निराला बाजार येथील पर्ल हॉटेल मध्ये ही चोरी झाली. प्रकरणात अंजली दमानिया (40, रा. विजयश्री दुर्गा 6 रोड, सांताक्रुज मुंबई) यांनी क्रांतीचौक  ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. 

या तक्रारीनूसार, 4 जून रोजी दमानिया या काही कामानिमत्त औरंगाबाद निराला बाजार येथील पर्ल हॉटेल येथे थांबल्या होत्या. त्यांनी त्यांची 1 लाख 73 हजार रुपयांचे मनगटी घड्याळ रॅक मध्ये ठेवले. काही वेळे नंतर त्या बाथरुमला गेल्या. ही संधी साधत चोरट्याने त्यांचे घड्याळ चोरले. दमानिया या बाथरुमहून रुममध्ये आल्या असता त्यांना रॅक मध्ये ठेवलेले घड्याळ दिसले नाही. त्यांनी रुममध्ये घड्याळ शोधले मात्र त्यांना ते सापडले नाही.  दमानिया यांच्या तक्रारीनंतर  क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पूढील तपास पोलीस  उपनिरीक्षक बागूल करित आहेत

Web Title: Anjali Damania's 1 million 73 thousand cost watche were stolen by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.