शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

-तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

लातूर : विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही विभागांत शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा.


लातूर : विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही विभागांत शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. विशेष बाब म्हणून लातूर जिल्ह्याला वाढीव अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असून, या मागणीचा विचार न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनांदोलन करेल, अशी माहिती आमदार अमित देशमुख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत दिली.
आ. अमित देशमुख म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांपासून लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांची परिस्थिती बिकट आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. दुष्काळ जाहीर केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. पिण्याच्या पाण्यासाठी भरीव मदत करावी. चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, शेतसारा माफ करण्यात यावा, विहीर-बोअर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत. चारा खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे. फळबाग पिकासाठी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात यावे. लातूर मनपाला टंचाई निवारणासाठी अतिरिक्त १० कोटी व जिल्हा परिषदेला ३० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही आमदार अमित देशमुख यांनी पत्रपरिषदेत केली. या मागण्यांचा विचार न केल्यास काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून जनांदोलन करेल, असेही ते म्हणाले.
पत्रपरिषदेला आ. त्रिंबक भिसे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, मोईज शेख, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, दगडूसाहेब पडिले, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)