शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अभियंता महिलेची अशीही आवड, बनली रेल्वे पायलट; आज करणार मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:40 IST

गेल्या दोन वर्षांपासून त्या असिस्टंट लोको पायलट म्हणून औरंगाबाद ते मनमाड मार्गावर मराठवाडा एक्स्प्रेसवर कर्तव्य बजावतात.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादकरांनो, दुचाकी, चारचाकी चालविणारी महिला तुम्ही पाहिली असेल...एसटी, ट्रक, रिक्षासह विमान चालविणारी महिलादेखील पाहिली असेलच ना? पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्या रेल्वेतून प्रवास करता, ती रेल्वेही एक महिला चालविते. ही महिला रेल्वे चालक म्हणजे औरंगाबाद-मनमाड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर रेल्वेचे सारथ्य करणाऱ्या असिस्टंट लोको पायलट स्नेहल नंदकिशोर सोमवंशी. जागतिक महिला दिनी त्या मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य करणार आहेत.

स्नेहल सोमवंशी या पुणे येथील असून त्या दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत औरंगाबादेत कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण बी. ई. मेकॅनिकल झालेले आहे. लहानपणापासूनच वेगळ्या वाटेने आयुष्य जगण्याची अंगी उर्मी. उच्च शिक्षण घेऊन इंजिनिअर झाल्यानंतर रेल्वे चालक या अवघड अशा क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले. रेल्वे चालक म्हटले की पुरुष, असेच नजरेसमोर येते. परंतु हे चित्र आता बदलत आहे. असिस्टंट लोको पायलट म्हणून स्नेहल या रेल्वेत दाखल झाल्या. त्यासाठी त्यांना कुटुंबीयांचे पाठबळ मिळाले. स्वप्नांना कठीण परिश्रमाची जिद्दीची जोड देत त्या यशस्वी वाटचाल करीत आहेत.

मुख्य जबाबदारी ही लोको पायलटच पार पाडतात. पण त्यासोबत असिस्टंट लोको पायलटचीही जबाबदारी महत्त्वाची ठरते. गेल्या दोन वर्षांपासून त्या असिस्टंट लोको पायलट म्हणून औरंगाबाद ते मनमाड मार्गावर मराठवाडा एक्स्प्रेसवर कर्तव्य बजावतात. त्याबरोबर नरसापूर-नगरसोल रेल्वेही त्यांनी अनेक वेळा चालविली आहे. रेल्वेत महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे एका दिवसात महिला रेल्वेचालक ये-जा करू शकतील, अशा मार्गावरच काम दिले जाते. औरंगाबादेत असि. लोको पायलट म्हणून स्नेहल यांच्यासह स्वाती संकेश्वर आणि कल्पना धनावत हेही कार्यरत आहेत. त्यांना चीफ लोको निरीक्षक प्रेमसिंग, के. नरेंद्र, व्ही. एन. साठे, चीफ क्रू कंट्रोलर जी. व्ही. गोरे यांचे मार्गदर्शन मिळते.

प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, हेच समाधानइंजिनच्या पाठीमागील बोगींमध्ये हजारो प्रवासी असतात. त्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य, हेच प्रशिक्षणात सांगितलेले आहे. आपल्या हातून प्रवासी सेवा घडते, याचे मोठे समाधान मिळते. शिवाय स्टेशनवरील लाॅबीमध्ये दिलेली जबाबदारीही पार पाडावी लागते.- स्नेहल सोमवंशी, असिस्टंट लोको पायलट

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे