शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंचे आरोप बालिशपणाचे, अब्रूनुकसानीचा दावा करणार; ११५० कोटींच्या घोटाळ्यावर भुमरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:09 IST

'अंबादास दानवेंचे मानसिक संतुलन बिघडले'; ११५० कोटींच्या आरोपावर संदिपान भुमरे कडाडले!

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीच्या मोबदल्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ११५० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार भुमरे यांनी हे आरोप फेटाळून लावत दानवेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे अंबादास दानवेंचा आरोप?अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला की, जटवाडा-जोगवाडा शिवारातील गट क्रमांक १७४ मधील २३ एकर ३ गुंठे जमीन, जिची किंमत सुमारे ११५० कोटी रुपये आहे, ती हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. दानवेंच्या मते, खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या नावावर १९७१ मध्ये 'हिबानामा' (मुस्लिम कायद्यानुसार बक्षीस पत्र) करून ३ एकर जमीन लाटण्यात आली. दानवेंनी सर्वात मोठा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला की, "जावेदचा जन्म १९८५ चा आहे, मग त्याच्या जन्माच्या १४ वर्षे आधी म्हणजेच १९७१ मध्ये त्याच्या नावावर जमीन कशी आली?" या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संदीपान भुमरेंचे सडेतोड प्रत्युत्तरया आरोपांना उत्तर देताना संदिपान भुमरे म्हणाले की, "अंबादास दानवेंचे संतुलन बिघडले आहे. ज्याचा जन्मच झाला नव्हता त्याच्या नावावर जमीन कशी येईल? हा केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा कट आहे." भुमरे यांनी दावा केला की, ज्या १७४ गट क्रमांकाचा उल्लेख दानवे करत आहेत, तो गट अस्तित्वातच नाही. "हिबानामा मुस्लिम कायद्यानुसार होतो, मग हिंदू महिलेने असा व्यवहार कसा केला? हा निव्वळ संभ्रम आहे. दानवेंनी केलेल्या या बालिश आरोपांविरुद्ध मी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे," असा घणाघात भुमरे यांनी केला.

प्रशासनाची भूमिकाया वादात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी स्पष्ट केले आहे की, १७४ या गटातून कोणतेही भूसंपादन झालेले नाही आणि तो गट देखील रेकॉर्डवर अस्तित्वात नाही. त्यामुळे मावेजा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रशासनाच्या या खुलाशामुळे आता दानवेंच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, तर दुसरीकडे राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Danve's mental state deteriorated; Bhumre retaliates on 1150 crore allegations!

Web Summary : Ambadas Danve accused Sandipan Bhumre of a ₹1150 crore land scam related to Samruddhi Mahamarg. Bhumre refuted claims, threatening defamation. Officials confirmed no land acquisition occurred from the non-existent plot, questioning Danve's allegations.
टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAmbadas Danweyअंबादास दानवेCrime Newsगुन्हेगारीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग