अपघातग्रस्तांना अंबादास दानवेंनी स्वत:च्या वाहनातून नेले रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 20:48 IST2024-05-05T20:47:48+5:302024-05-05T20:48:00+5:30
यावेळी अपघातातील एका ज्येष्ठावर त्यांनी प्रथमोपचार केले.

अपघातग्रस्तांना अंबादास दानवेंनी स्वत:च्या वाहनातून नेले रुग्णालयात
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर- कन्नड महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमींसाठी स्वत:च्या वाहनांचा ताफा थांबविला. यावेळी अपघातातील एका ज्येष्ठावर त्यांनी प्रथमोपचार केले.
सोबत असलेला चिमुकला रडत असताना त्याचे अश्रू पुसून दानवे यांनी आपल्या स्वतःच्या ताफ्यातील गाडीत बसून त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठविले. शेख हबीब, मुलगा शेख समीर व नातू शेख हरीश अशी अपघातग्रस्तांची नावे आहेत. वेळेवर उपचार आणि तात्काळ दवाखान्यात दाखल केल्याबद्दल शेख हबीब यांनी दानवे यांचे आभार मानले.