ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 11:37 AM2024-03-30T11:37:35+5:302024-03-30T11:45:44+5:30

Ambadas Danve : ठाकरे गटाचा मोठा नेता आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ambadas Danve of the Thackeray group clarified the discussions about joining the BJP | ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

 Ambadas Danve :   गेल्या दोन दिवसापूसन ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज भाजपाचे रावसाहेब दानवे यांनीही बोलताना ठाकरे गटाचे अंबादास दानवे प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. हा पक्ष प्रवेश आजच होणार असल्याचीही चर्चा सुरू होती. यावर आता ठाकर गटाचे अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. 

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा

"ज्या माध्यमांनी माझा पक्ष प्रवेश १० वाजता होणार होता हे सांगितलं होतं ते खोटं ठरवलं आहे. मी कोणताही पक्ष प्रवेश करणार नाही. माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. पद येत असतात, पद जात असतात. मी बाळसाहेबांचा शिवसैनिक आहे. अशा खोट्या बातम्या भाजपा पसरवत आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. 

स्टार प्रचारकांच्या यादीत माझं नाव

अंबादास दानवे म्हणाले, मी काम करणारा शिवसैनिक आहे. मला पक्षातून बाहेर पडायचं असतं तर मागेच बाहेर पडलो असतो. माझ्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. मी नाराज असलो म्हणून काय झालं, मी तीस वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहे. शिवसेनेचे आणि भाजपाचे विचार सारखे होते त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो का आम्ही शिवसेनेतच राहिलो. आता मी प्रचारात उतरणार आहे. मागच्या आठवड्यातच १०० गावांचा दौरा केला आहे, मी शिवसेनेचाच प्रचार करणार आहे. माझ नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.

"चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी आणि मीही तिकीट मागितले होते. खैरे साहेब आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. मला महायुतीकडून कोणतीही ऑफर नाही. महायुतीकडे आमच्याविरोधात लढायला उमेदवार सापडलेला नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यातील नाराजी संपली आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले. 

"मराठवाड्यात महायुतीची एकही जागा निवडून येणार नाही. पक्ष प्रवेशाच्या बातम्या भाजपा पेरत आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.

Web Title: Ambadas Danve of the Thackeray group clarified the discussions about joining the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.