उर्ध्व भागातील धरणातून येणारी आवक घटली, तरी जायकवाडीने ८० टक्के पातळी गाठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:21 IST2021-09-25T19:17:40+5:302021-09-25T19:21:22+5:30
Jayakwadi Dam News : नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून होणारे विसर्ग शुक्रवार पासून जवळपास बंद केल्याने गोदावरीतून मिळणारी आवक अत्यंत नगण्य झाली आहे.

उर्ध्व भागातील धरणातून येणारी आवक घटली, तरी जायकवाडीने ८० टक्के पातळी गाठली
पैठण : जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून होणारे विसर्ग नाममात्र करण्यात आल्याने धरणात येणारी आवक शनिवारी दिवसभरात कमी कमी होत गेली. सायंकाळी धरणात १०३४४ क्युसेस आवक होत होती तर जलसाठा ८०% झाला होता.
नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून होणारे विसर्ग शुक्रवार पासून जवळपास बंद केल्याने गोदावरीतून मिळणारी आवक अत्यंत नगण्य झाली आहे. नागमठान येथून गोदावरीत ७२० क्युसेस पाणी मिळत होते. अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून देखील विसर्ग घटविण्यात आल्याने प्रवरेतून सायंकाळी सहा वाजता देवगड बंधारा (नेवासा) येथून २७५७ क्युसेस क्षमतेने पाणी जायकवाडी कडे येत होते.
हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात
दरम्यान, स्थानिक पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणात १०३४४ क्युसेस आवक सुरू आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेस धरणाचा जलसाठा ७९.७३% झाला होता. आवक लक्षात घेता रविवारी ८०% होईल असा अंदाज धरण नियंत्रण कक्षातून वर्तविण्यात आला. १५२२ जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५१८ फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त चार फूट बाकी आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १७३१.०५८ दलघमी झाला आहे.
हेही वाचा - मुसळधार पावसाचा प्रकोप; घराचे लाकडी छत कोसळून आजोबासह नातीचा मृत्यू