शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 7:38 PM

हरिभाऊ बागडेंची मध्यस्थी व्यर्थ; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना व भाजपात बिनसल्याचे समोर आले आहे.

पैठण: भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला केवळ एकच जागा देऊ केल्याने स्वाभिमान दुखावलेल्या भाजपाने गुरूवारी सर्व उमेदवारांचे अर्ज एकाचवेळी परत घेऊन शिवसेनेला धक्का दिला आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना व भाजपात बिनसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे व भाजपाचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक शिवसेना (शिंदे गट) व भाजपाने युती करून लढावी असे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. पैठण बाजार समितीच्या १८ जागेसाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु गुरूवारी एकाचवेळी हे अर्ज परत घेण्यात आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.  

भाजपाला केवळ एकच जागा ( योगेश सोलाटे) देण्यात येईल एक पेक्षा जास्त जागा देण्यात येणार नाही अशी भूमिका शिवसेनेचे आमदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली. ठरलेल्या ६०/४० फॉर्म्युल्यानुसार भाजपाच्या वाट्यास सात जागा येतात. आम्ही पालकमंत्री भुमरे यांच्याकडे केवळ चार जागा मागितल्या. यासाठी दोन वेळेस बैठका घेण्यात आल्या. परंतु, केवळ एक जागा देण्यात येईल अशी भूमिका भुमरे यांनी घेतल्याने भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारी अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला असे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे यांनी सांगितले. 

भाजपाला प्राधान्य दिले जाईल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांचे राजकीय सूत्र जमून येत नसल्याने जागा वाटपावर एकमत होत नव्हते. कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला प्राधान्य देऊन यापुढील निवडणुकीत जागा दिल्या जातील. युतीचा धर्म दोन्ही बाजूने पाळण्यात येईल. बाजार समितीची निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिल्या. 

उमेदवार नसले तरी युती धर्म पाळूभाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत युतीचा धर्म पाळतील, यात शंका नाही. जागा वाटपा वरून झालेला प्रकार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात आला आहे.  या संदर्भात पक्ष पुढील जो आदेश देईल त्या प्रमाणे भूमिका घेतली जाईल असे यावेळी डॉ सुनील शिंदे यांनी सांगितले. 

उमेदवारी अर्ज मागे घेतले....गुरूवारी उमेदवारी अर्ज परत घेणाऱ्यात संतोष खराद, अशोक बोबडे, दादासाहेब घोडके, चंद्रकांत तांगडे, वैजिनाथ काळे, रघुनाथ ईच्छैय्या, शिला एरंडे, चंद्रकांत हुड, दादासाहेब मापारी, योगेश सोलाटे, गुजरणबाई ईच्छैय्या, विजय कुलकर्णी व अंकुश रहाटवाडे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज परत घेताना भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, संघटन मंत्री लक्ष्मण औटे, बप्पा शेळके, भाऊसाहेब बोरूडे, सुरेश गायकवाड, भांड, सुनील वीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा