बालरोगतज्ज्ञ संघटनेला सर्वोकृष्ट शाखा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:40 IST2018-12-31T21:40:20+5:302018-12-31T21:40:37+5:30
बालरोगतज्ज्ञ संघटना औरंगाबाद शाखेला २०१८ चा सर्वोकृष्ट शाखा हा बहुमान लाभला आहे.

बालरोगतज्ज्ञ संघटनेला सर्वोकृष्ट शाखा पुरस्कार
औरंगाबाद : बालरोगतज्ज्ञ संघटना औरंगाबाद शाखेला २०१८ चा सर्वोकृष्ट शाखा हा बहुमान लाभला आहे. महाबळेश्वर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चर्चासत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सीएमई, सामाजिक जागरूकता, बालकांच्या स्वास्थ्यासाठी केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला. किशोर दिवस, ओआरएस दिवस, मुलींसाठी स्वयंरक्षणाचे शिक्षण, स्थूलतेवर नियंत्रण यासह आरोग्यासंदर्भात वर्षभरात विविध कार्यशाळा, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्यात आले. यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश ठाकरे, सचिव डॉ. रोशनी सोधी, कोषाध्यक्ष डॉ. अभय जैन, उपाध्यक्ष डॉ. मकरंद दिवाण, डॉ. सचिन देशमुख, डॉ. वर्षा वैद्य, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. रेणू बोराळकर, डॉ. राजेंद्र वैद्य, डॉ. मंजूषा शेरकर, डॉ. राजेंद्र खडके, डॉ. दत्ता कदम आदींनी प्रयत्न केले.