शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे नामांतर

By admin | Updated: September 1, 2014 00:45 IST

शातील स्टाफ कॉलेजेसच्या नामांतरचा निर्णय हा १० आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे.

विजय सरवदे,  औरंगाबादविद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियंत्रणाखाली चालणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अकॅडेमिक स्टाफ कॉलेजसारखे (विद्या प्रबोधिनी) देशभरात ६६ स्टाफ कॉलेजेस असून, यापैकी यापुढे यातील ६१ कॉलेजेसला मनुष्यबळ विकास केंद्र तर उर्वरित ५ कॉलेजेसना क्षेत्रीय क्षमता विकास केंद्र म्हणून ओळखले जाईल. देशातील स्टाफ कॉलेजेसच्या नामांतरचा निर्णय हा १० आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अकॅडेमिक स्टाफ कॉलेजला क्षेत्रीय क्षमता विकास केंद्र म्हणून दर्जा मिळावा, यासाठी सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. अरुण खरात यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्टाफ कॉलेजेसमार्फत उद्बोधन वर्ग, उजळणी वर्ग आणि शॉर्ट टर्म कोर्सेस हे पहिल्यासारखेच सुरू राहतील. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा स्टाफ कॉलेजेसच्या स्ट्रक्चरमध्ये संशोधनात्मकदृष्ट्या थोडाफार बदल केलेला आहे. ‘यूजीसी’चा कल आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाकडे आहे. बदलत्या काळाची गरज म्हणून अभ्यासक्रमात माहितीतंत्रज्ञानासारख्या विषयांचा समावेश करण्याचे धोरण ‘यूजीसी’ने अंमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यानुसार विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना माहितीतंत्रज्ञानाचे ज्ञान अद्ययावत करावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून स्टाफ कॉलेजेसही आपल्या अभ्यासक्रमात बदल करून उद्बोधन वर्गात प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जाईल.