शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:39 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे...

राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून केव्हाही घोषणा होऊ शकते. सध्या राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची युती आहे. मात्र, असे असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाम यांनी म्हटले आहे.

चव्हाण म्हणाले, "या मतदारसंघात मी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून काम करत आहे. मतदारसंघातही अस्वस्थता आहे. म्हणावा तसा विकास या मतदारसंघात झालेला नाही. यातच गेल्या 15 वर्षांपासून कार्यकर्त्यांचीही मोठी घुसमट होत आहे. त्यामुळे येथे काम करत असताना लोकांना बदल अपेक्षित असल्याचे माझ्या लक्षा आले. यामुळे मी येथून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे." ते एबीपी माझासोबत बोलत होते.

भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, "आता सर्व्हेचा जमाना आहे. थोडे कमी-अधिक होईल, पण जनता ज्याला पसंती देते, त्याचे सर्व्हेमध्ये नाव येते आणि सर्व्हेमध्ये जाचे नाव आले, त्याला पक्ष अथवा संबंधित आघाडी उमेदवारी देते, असे सुरू आहे. त्यामुळे लढावे तर लागेल. त्यामुळे सर्व्हेतही मी पुढे येईल असे वाटते."

सर्व्हे करून तिकीट ठरवावे अशी इच्छा आहे का? असे विचारले असता, "असे नाही मला लढायचेच आहे. कारण सर्व्हेचे अंदाजही चुकू शकतात. त्यांच्या अथवा आमच्या बाजूने. पण लढणे मला क्रमप्राप्त आहे, कारण कार्यकर्त्यांचा माझ्यामागे प्रचंड आग्रह आहे," असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. सध्या भाजपचे प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे आमदार आहेत.

 

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024