शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श... अखेर विमान झेपावले

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

औरंगाबाद : सलग दोन दिवस स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने पुढील उड्डाणे रद्द होणार का याची धाकधूक प्रवाशांना लागली होती.

औरंगाबाद : सलग दोन दिवस स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने पुढील उड्डाणे रद्द होणार का याची धाकधूक प्रवाशांना लागली होती. अखेर तिसऱ्या दिवशी स्पाईस जेटचे विमान आकाशात झेपावले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केवळ ७० प्रवाशांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झाले. यावरून दोन दिवसांच्या परिस्थितीमुळे स्पाईस जेटच्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसून आले. शिवाय स्पाईस जेटच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानाची महिनाभराची बुकिंग असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान (क्रमांक : सीजी १७३) १६ डिसेंबरला अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यानंतर स्पाईस जेटचे १७ डिसेंबरलाही विमान रद्द झाल्याने ११० प्रवाशांना धावाधाव करण्याची वेळ आली. मंगळवारचे विमान रद्द झाल्यानंतर बुधवारचे विमान जाणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. अशा स्थितीतही तिकिटाची बुकिंग झाली. यानंतर पुन्हा बुधवारी विमान रद्द झाले. यामुळे किमान गुरुवारी जाणार का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. याविषयी काहीही सांगता येणार नसल्याचे स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच विमानतळावरील स्पाईस जेटच्या कक्षाशी संपर्क साधून पुढील उड्डाण रद्द आहे का, अशी शंकाही अनेक प्रवाशांकडून विचारली जात होती. त्यामुळे औरंगाबादहून पुढील उड्डाणे होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.