शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही विमान रद्द

By admin | Updated: December 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान बुधवारीही रद्द झाल्याने ११० प्रवाशांना प्रवासासाठी धावाधाव करण्याची वेळ आली.

औरंगाबाद : स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान बुधवारीही रद्द झाल्याने ११० प्रवाशांना प्रवासासाठी धावाधाव करण्याची वेळ आली. यावेळी विमान रद्द झाल्याबाबत मेसेज न मिळाल्याने अनेक प्रवासी विमानतळावर आले होते; परंतु ऐनवेळी विमान रद्द झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्यांना विमान रद्द होणार होते हे माहीत असूनही विमानाचे बुकिंग करून छळ करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला. स्पाईस जेटच्या बेपर्वाईचा प्रत्यय सलग दुसऱ्या दिवशी विमानतळावर आला. मंगळवारी दिल्लीला जाणारे विमान (क्रमांक : सीजी १७३) अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. आज बुधवारीही विमान रद्द झाल्याने हीच परिस्थिती दिसून आली. विमान रद्द झाल्याबाबत प्रवाशांना ‘मेसेज’ तसेच ‘कॉल’ करून माहिती देण्यात आल्याचे विमानतळावरील स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु प्रत्यक्षात अनेकांना हा मेसेज मिळाला नसल्याचे दिसून आले. ‘मेसेज’ आणि ‘कॉल’ न आल्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांकडून विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. ऐनवेळी विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विमान रद्द झाल्याने पुण्याहून दिल्ली जाण्याची वेळ काही जणांवर आली; परंतु सकाळीच कळाले असते, तर लवकर निघता आले असते, असे प्रवाशांनी सांगितले.गुरुवारचे उड्डाणही अनिश्चितमंगळवारचे विमान रद्द झाल्यानंतर बुधवारचे विमान जाणार की नाही, याची अनिश्चितता निर्माण झाली होती. अशा स्थितीतही तिकिटाची बुकिंग झाल्याचे दिसून आले. बुधवारीही विमान रद्द झाल्यानंतर किमान गुरुवारी जाणार का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. त्याबाबत काहीही सांगता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. यामुळे स्पाईस जेटची औरंगाबादहून पुढील उड्डाणे होणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण निर्माण झाली आहे.मोठ्या विमानाची उपलब्धताएअर इंडियाची सध्या १३० आसनी विमानसेवा आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आगामी काळात १७२ आसनी विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर वसंत बरडे यांनी सांगितले.