कारगिल उद्यानात एअर फोर्स एरोमॉडेल शो!

By Admin | Updated: October 9, 2014 00:50 IST2014-10-09T00:36:45+5:302014-10-09T00:50:47+5:30

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन उद्यानात एअर फोर्स दिनानिमित्त (वायुसेना दिवस) ‘एरोमॉडेल शो’चे आयोजन करण्यात आले होते.

Air Force Aromodel Show in Kargil Park! | कारगिल उद्यानात एअर फोर्स एरोमॉडेल शो!

कारगिल उद्यानात एअर फोर्स एरोमॉडेल शो!

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन उद्यानात एअर फोर्स दिनानिमित्त (वायुसेना दिवस) ‘एरोमॉडेल शो’चे (विमानाच्या प्रतिकृतींचे हवाई प्रात्यक्षिके) आयोजन करण्यात आले होते. एअर फोर्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी हा शो पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार, निवृत्त विंग कमांडर टी.आर. जाधव, नगरसेवक पंकज भारसाखळे, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी मे. चंद्रसेन कुलथे, उपजिल्हाधिकारी राजपूत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी केंदे्र, गुट्टे, राजाराम मोरे, सुनील त्रिभुवन यांच्यासह नागरिक व ८ शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
पुण्याहून आलेले वायुसेनेतील निवृत्त अधिकारी पाठक, खरे यांनी विद्यार्थ्यांनी वायुसेनेची व विमानांची माहिती दिली. मुलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ विमान कसे बनवायचे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. लढाऊ व युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांची माहितीही विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. ती विमाने आकाशात उडवून दाखविण्यात आली. स्वान, द्रोण या लढाऊ विमानांच्या प्रतिकृती पुण्याहून मागविण्यात आल्या होत्या. लढाऊ विमानांची माहिती अधिकारी पाठक यांनी सांगितली. विमानांच्या प्रतिकृती मुलांना हाताळल्या. नंदनवन कॉलनीत लोकमतने बांधलेल्या वसतिगृहातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी ४० बाय ४० ची लक्षवेधी रांगोळी काढली होती.

Web Title: Air Force Aromodel Show in Kargil Park!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.