साडेसातशे दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळले आयप्पा मंदिर

By Admin | Updated: November 7, 2014 00:51 IST2014-11-07T00:41:08+5:302014-11-07T00:51:53+5:30

औरंगाबाद : हातात मोराचे पीस आणि ‘ॐ षण्मुखाय विद्यमये, महा सेनाय धीमही, तन्नो षष्ठोदयात’ या मंत्राचा उच्चार करीत कार्तिकेय देवतेच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेरून रांगा लागल्या होत्या.

Ahaappa Ahaappa Temple with a bright light in the illusion | साडेसातशे दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळले आयप्पा मंदिर

साडेसातशे दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळले आयप्पा मंदिर

औरंगाबाद : हातात मोराचे पीस आणि ‘ॐ षण्मुखाय विद्यमये, महा सेनाय धीमही, तन्नो षष्ठोदयात’ या मंत्राचा उच्चार करीत कार्तिकेय देवतेच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेरून रांगा लागल्या होत्या. निमित्त होते, कार्तिकी पौर्णिमेचे. या निमित्ताने शहरातील आयप्पा मंदिरात ५० किलो फुलांच्या रांगोळीत ७५० दिव्यांची सजावट करून आयप्पा मंदिर उजळले.
कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर कार्तिकेयाचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस कार्तिकी पौर्णिमा ऊर्फ त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आयप्पा मंदिर, कार्तिकेय मंदिरात फुलांच्या रांगोळीत ७५० दिव्यांची माळ सजवून ही पौर्णिमा साजरी केली जाते.
दक्षिण भारतात या देवतेचे वर्षातून एकदाच दर्शन घेता येते. तो दिवस म्हणजे कार्तिका पौर्णिमा. याच दिवशी त्रिपुरा नावाच्या राक्षसाचा वध करण्यात आला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते.
या वर्षीचा पूजेचा मुहूर्त पहाटे ४.३० वाजताचा होता, तर समाप्ती रात्री ३.५३ वाजता होणार आहे. यामुळे या देवतेची पूजा ही सकाळी ६ वाजता झाली. केरळच्या चेंदामेलम या वाद्याच्या साह्याने सतत मल्याळम धून वाजत असल्यामुळे परिसर भक्तिमय बनला होता. यावेळी शेवंतीच्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांत दिव्यांची आरास मांडून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.
या देवतेची काही प्रमुख नावे
कार्तिकेय, षडान्न, पार्वतीनंदन, शरजन्मा, षण्मातूर, तारकाजित, सेनानी, षण्मुख, स्कंद, मयूरवाहन, क्रोचारी, मुरूगन, कोमारन.

Web Title: Ahaappa Ahaappa Temple with a bright light in the illusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.