शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कृषी योजना पोहोचल्या

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़

लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़ लातूर विभागाने आतापर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांच्या बांधावर योजना पोहोचवल्या आहेत़ पॉली हाऊस, राष्ट्रीय फलोत्पादन, पीक प्रात्यक्षिके, नेट हाऊस, क्षेत्र विस्तार आदी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून मंगळवारी साजरा होत आहे़ त्यानिमित्त जिल्हास्तरीय मेळावे घेऊन या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे़ मृग नक्षत्र कोरडे गेले आहे़ आर्द्रा नक्षत्रातही अद्याप पाऊस झाला नाही़ परिणामी यंदा फक्त २ टक्केच पेरण्या झाल्या आहेत़ जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ७० ते ८० मि़मी़ पाऊस झाल्यानंतर पेरण्या होऊ शकतात़ परंतु इतका पाऊस अद्याप झाला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात चर खोदण्यासाठी प्रोत्साहान देण्यात येत आहे़ चर खोदलेल्या शेतात जर ६० टक्के मि़मी़पाऊस झाला तर तेथे पेरणी करता येऊ शकते़ या अनुषंगाने शेतकऱ्यांना मंगळवारी होत असलेल्या मेळाव्यात माहिती दिली जाणार असल्याचे कृषी सहायक संचालक के.एन. देशमुख यांनी दिली़ लातूर विभागातील १८ लाख शेतकऱ्यांपैकी अडीच लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजना माहित होण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनापासून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ शंभर, पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत़ त्यात ठिबक तुषार योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना, अवजारे योजना, सिमेंट बंधारे, नाला बंधारे, खाजगी नर्सरी स्थापने, पॉलिहाऊस, पॅकिंग हाऊस, ग्रीन शेड-नेट हाऊस आदी योजनांचा समावेश आहे़ पिक उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत़ परंतु या योजनांची माहिती शेतकऱ्यांना होत नाही़ त्यामुळे लाभापासून शेतकरी वंचित राहतात़ गरजू व प्रयोगशिल शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा मेळाव्यांचे आयोजन केले असल्याचे सहायक संचालक देशमुख यांनी सांगितले़अध्यक्षांच्या उपस्थितीत मेळावा...लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे़ जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, डेप्युटी सीईओ या मेळाव्यात कृषी योजनांची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणार आहेत. जिल्हा परिषद व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी योजनांचा आढावाच यावेळी घेतला जाईल.