शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमक मराठा आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:23 IST

दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

वैजापूर :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. उद्या सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शाह यांची सभा भाजपाकडून आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आक्रमक मराठा आंदोलकांनी शाह यांच्या सभेची माहिती देणारे आणि स्वागताचे बॅनर वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे आज दुपारी फाडले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर सरकारचा निषेध केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीचे जवळ आली असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात मराठा कुणबी आरक्षण आंदोलनाने जोर धरला असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सभेची माहिती देणारे बॅनर भाजपाकडून उभारण्यात आले आहेत. आज सकाळी अजय पाटील साळुंखे इतर मराठा आंदोलकांनी शाह यांच्या सभेचे बॅनर फाडून मराठा आरक्षण ओबीसीतून दिले नसल्याचा निषेध व्यक्त केला.  

सरकारचा निषेध करत फाडले बॅनरकुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलन सुरू आहे. कुणबी नोंदी संपल्यानंतर सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.  ओबीसीतून आरक्षण मिळाले नसल्याने मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच आज दुपारी मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर सरकारचा निषेध करत आंदोलकांनी वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले. एक मराठा, लाख मराठा, ओबीसीतून आरक्षण द्यावे, शेतमालास भाव द्यावा अशा मागण्या करत आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAurangabadऔरंगाबादBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण