छेडछाडीची पहिली तक्रार मागे घेण्यासाठी पिडीतेशी पुन्हा गैरवर्तन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:18 IST2018-05-10T18:17:27+5:302018-05-10T18:18:53+5:30

छेडछाडीची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला रस्त्यात अडवून तिला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन पुन्हा तिच्यासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या एका जणाविरोधात सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला

Again abusing Pidita to abolish the first complaint of tampering | छेडछाडीची पहिली तक्रार मागे घेण्यासाठी पिडीतेशी पुन्हा गैरवर्तन 

छेडछाडीची पहिली तक्रार मागे घेण्यासाठी पिडीतेशी पुन्हा गैरवर्तन 

औरंगाबाद : छेडछाडीची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला रस्त्यात अडवून तिला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन पुन्हा तिच्यासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या एका जणाविरोधात सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ८ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावर घडली. 

श्रीराम साहेबराव नवले (रा. छत्रपतीनगर), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडितेची आरोपीने काही दिवसांपूर्वी छेड काढली होती. याप्रकरणी पीडितेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविलेली आहे. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपी सतत तिच्यावर दबाव टाकत आहे. पीडिता मात्र त्याच्या दबावाला बळी पडत नाही. ८ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पीडिता मुलीसोबत बँकेतून घरी जात असताना आरोपीने त्यांना गाठले. त्याने पुन्हा पोलिसांतील तक्रार मागे घ्यावी, यासाठी शिवीगाळ करून धमकावले आणि रस्त्यातच तिचा पंजाबी ड्रेस फाडून विनयभंग केला. याविषयी पीडितेने सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक उपनिरीक्षक बºहाटे तपास करीत आहेत.

Web Title: Again abusing Pidita to abolish the first complaint of tampering