आता तीन वर्षानंतर आपसी बदली !
By Admin | Updated: May 21, 2015 00:29 IST2015-05-21T00:25:00+5:302015-05-21T00:29:11+5:30
उस्मानाबाद : पूर्वी गुरूजींच्या आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पाच वर्षांची अट होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे.

आता तीन वर्षानंतर आपसी बदली !
उस्मानाबाद : पूर्वी गुरूजींच्या आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पाच वर्षांची अट होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे. कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची (वर्ग-३, ४) तीन वर्ष सेवा झाली असले, ते आता आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. ग्रामविकास विभागाकडून २० मे रोजी तसा आदेश काढण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने आपसी आंतरजिल्हा बदलीचा पर्याय पुढे आला होता. सुरूवातीला अशास्वरूपाच्या बदलीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये किमान तीन सेवेची अट घालून देण्यात आली होती. परंतु, २०११ मध्ये सदरील अट रद्द करून सेवेच्या कालावधीत वाढ करण्यात आली. सदरील कालावधी ५ वर्षांचा करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची पुन्हा गैरसोय सुरू झाली होती. याबाबत शिक्षक संघटनांसोबतच अन्य कर्मचाऱ्यांकडून पाठपुरवा करण्यात आला होता. याची दखल घेत शासनाने पाच वर्षाची अट शिथिल केली आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांनी कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षे सेवा केली असेल, त्यांना आता हव्या त्या जिल्ह्यामध्ये जात येणार आहे. तसा आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने २० मे रोजी काढला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेकडो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)