आरोग्य विभागानंतर आता पर्यटन संचालनालयाकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख
By संतोष हिरेमठ | Updated: August 10, 2022 20:25 IST2022-08-10T20:16:21+5:302022-08-10T20:25:09+5:30
‘महाराष्ट्र टुरिझम’ या ट्विटर अकाऊंटवरून देवगिरी किल्ल्याची माहिती देताना ‘संभाजीनगर’ उल्लेख करण्यात आला आहे.

आरोग्य विभागानंतर आता पर्यटन संचालनालयाकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख
संतोष हिरेमठ
औरंगाबाद: राज्य सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांकडून याला विरोध झाला. काही दिवसांपूर्वीच गूगल मॅपवरही औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्जियाज जलील यांनी या नामकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. शहराचे नाव संभाजीनगर केले तरीदेखील आम्ही औरंगाबदच म्हणणार असा त्यांचा पवित्रा आहे. दरम्यान, आता राज्याच्या पर्यटन विभागानेच औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
संभाजी नगरमधील देवगिरी किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून पर्यटकांना इतिहासात डोकावण्यासाठी आणि आपल्या समृद्ध वारसाबद्दल जाणून घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे. आपण येथे गेला आहात का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.
— Maharashtra Tourism (@maha_tourism) August 10, 2022
सावर्जनिक आरोग्य विभागानंतर आता राज्याच्या पर्यटन संचालनालयाने औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ म्हणून केला आहे. ‘महाराष्ट्र टुरिझम’ या ट्विटर अकाऊंटवरून देवगिरी किल्ल्याची माहिती देताना हा उल्लेख करण्यात आला आहे. ‘संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला ऐतिहासिकदृषट्या महत्त्वाचा असून, पर्यटकांना इतिहासात डोकावण्यासाठी आणि आपल्या समृद्ध वारसाबद्दल जाणून घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे. आपण येथे गेला आहात का?...’ असा या ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आल्यानंतर सामाजिक माध्यमांमध्ये पुन्हा एकदा औरंगाबाद आणि संभाजीनगर यावरून चर्चा सुरु झाली.