चावडी वाचनानंतर साडेचारशे आक्षेप दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:38 IST2017-10-04T23:38:05+5:302017-10-04T23:38:05+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे चावडी वाचन झाल्यानंतर प्रशासनाकडे ४४२ आक्षेप दाखल झाले आहेत़ ५ आॅक्टोबर रोजी देखील शेतकºयांना आक्षेप दाखल करता येणार आहेत़ तेव्हा ज्यांना शंका असतील अशा शेतकºयांनी आपले आक्षेप दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़

चावडी वाचनानंतर साडेचारशे आक्षेप दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे चावडी वाचन झाल्यानंतर प्रशासनाकडे ४४२ आक्षेप दाखल झाले आहेत़ ५ आॅक्टोबर रोजी देखील शेतकºयांना आक्षेप दाखल करता येणार आहेत़ तेव्हा ज्यांना शंका असतील अशा शेतकºयांनी आपले आक्षेप दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे़ २२ सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल केले, त्या अर्जाचे १ व २ आॅक्टोबर रोजी चावडी वाचन करण्यात आले़ एकूण ६४४ गावांमध्ये हे चावडी वाचन पूर्ण झाले आहे़ लाभार्थी शेतकºयांना काही अडचणी असल्याचे या उपक्रमातून निदर्शनास आले़ चावडी वाचनानंतर लाभार्थ्यांच्या अडचणी सदस्य सचिव, तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी स्वरुपात स्वीकारले जात आहेत़ ४ आॅक्टोबरपर्यंत असे ४४२ आक्षेप प्रशासनाकडे दाखल झाले़ ५ आॅक्टोबर रोजीही आक्षेप स्वीकारले जाणार आहेत़