शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ‘गो एअर’चे विमान दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:40 PM

चार खाजगी बसने प्रवासी रात्री उशिरा मुंबईला रवाना

ठळक मुद्देरविवारी सायंकाळी अचानक आपत्कालीन लँडिंग

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झालेले गो एअर कंपनीचे पाटणा-मुंबई विमान सोमवारी पाच तासांच्या प्रयत्नांनंतर दुरुस्त होऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या विमानातील प्रवासी रविवारी रात्री उशिरा चार खाजगी बसने मुंबईला गेले. 

पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. अशा परिस्थितीत विमानातील वातानुकूलित यंत्रणाही बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. परंतु वैमानिकाने प्रसंगावधान राखून औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे १६४ प्रवासी बालंबाल बचावले. या सगळ्या परिस्थितीनंतर प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

गो एअरची कोणतीही व्यवस्था नसल्याने एअर इंडियाच्या यंत्रणेची मदत घेण्यात आली. विमानातून उतरल्यानंतर विमानतळावर प्रवाशांच्या अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. विमान दुरुस्त होईल अथवा अन्य विमानाची सोय होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर या दोन्हीपैकी काहीही झाले नाही. विमान दुरुस्तीसाठी कंपनीचे अभियंते, तंत्रज्ञांना येण्यास विलंब झाला. अशा परिस्थितीत प्रवाशांना खाजगी बसने मुंबईला नेण्याचे नियोजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चार खाजगी बसद्वारे प्रवासी रवाना झाला. मुंबईच्या प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशी होणारचिकलठाणा विमानतळावर लँडिंग झाल्यानंतरही वैमानिक विमानातच बसून वरिष्ठ पातळीवर संवाद साधत होते. सोमवारी सकाळी सहा वाजता दाखल झालेल्या इंजिनिअर, तंत्रज्ञांनी विमान दुरुस्त केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे विमान मुंबईकडे झेपावले. जे वैमानिक आले होते, त्यांनीच विमान नेले. या सगळ्या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार असल्याचीही माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानtourismपर्यटन