शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तांतरानंतर शहर झाले जीटीएलमुक्त

By admin | Updated: November 18, 2014 01:12 IST

अशोक कारके , औरंगाबाद केंद्रात, राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर झाले की, त्याचे पडसाद विविध क्षेत्रांत आणि विविध ठिकाणी उमटतात.

अशोक कारके , औरंगाबादकेंद्रात, राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर झाले की, त्याचे पडसाद विविध क्षेत्रांत आणि विविध ठिकाणी उमटतात. त्याचा प्रत्यय शहरात दिसून येत आहे. राज्यातील सत्तांतराचा पहिला इफेक्ट औरंगाबादेत जीटीएलवर होणाऱ्या कारवाईतून दिसून येत आहे.केंद्रात भाजपाच्या मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सत्तांतर होईल, असे चित्र निर्माण झाले होते. त्याप्रमाणे राज्यात सत्तांतर झाले. त्याचे परिणाम हळूहळू दिसून येऊ लागले आहेत. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या आशीर्वादाने महावितरणकडून शहरातील वीजपुरवठ्याचे काम जीटीएलला २०११ मध्ये देण्यात आले होते. आघाडी सरकारच्या काळात महावितरण आणि जीटीएलमध्ये वीज बिलाच्या थकबाकीमुळे अनेक वेळा खटके उडाले; पण राजकीय दबावामुळे जीटीएलवर कारवाई झाली नाही. आघाडी सरकारच्या काळातही जीटीएलकडे महावितरणची थकबाकी होती. त्यासाठी पहिली नोटीस ८ मे २०१४ रोजी जीटीएलला देण्यात आली होती; पण जीटीएलने नोटिसीला गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर राज्यात सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली. महावितरणने १७ सष्टेंबर रोजी प्राथमिक करार रद्द करण्यासाठी दुसरी नोटीस दिली. त्यानंतर पुन्हा १३ दिवसांनी तिसरी प्राथमिक करार रद्द करण्याची नोटीस जीटीएलला देण्यात आली. जीटीएलच्या अधिकाऱ्यांनी राजकीय आशीर्वाद असल्यामुळे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले; पण यावेळी राज्यात सत्तांतर झाले होते. त्याचा परिणाम १० नोव्हेंबर रोजी जीटीएलला अंतिम करार रद्द करण्याच्या नोटिसीमधून दिसून आला. नोटिसीनंतर जीटीएल कायम करण्यासाठी राजकीय प्रयत्न झाले; पण सत्तांतर झाल्यामुळे त्या प्रयत्नांना अपयश आले.शहरात जीटीएल राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या रुचीने आली. सत्तांतर झाले की, कंपनीला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस देण्यात आली होती. अखेर औरंगाबादकर शनिवारी दुपारीच जीटीएलमुक्त झाले. जीटीएलचे कंत्राट रद्द केल्यामुळे राष्ट्रवादीला हा पहिला झटका असल्याची चर्चा होत आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांतराचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जीटीएलकडील थकबाकीच्या वसुलीची प्रक्रिया अधिक वेगात सुरू झाली. १ नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळ्यानंतर महावितरणने कायदेशीर करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर १० नोव्हेंबर रोजी अंतिम नोटीस देऊन १५ नोव्हेंबर रोजी वीजपुरवठ्याचा ताबा घेतला.महावितरण आणि जीटीएलचे कर्मचारी-अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी सत्तांतरामुळे शहर जीटीएलमुक्त झाले असे खाजगीत बोलताना मान्य करीत आहेत.शहरात जीटीएल आणतेवेळी बारामती आणि नांदेडमध्ये वीज गळती अधिक होती; पण त्या ठिकाणी फ्रँचायजी देण्यात आली नाही. त्यामागेही राजकीय कारण होते. आताही आहे.- अरुण पिवळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ