शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

समांतर जलवाहिनीसंदर्भात शपथपत्र दाखल करावे -खंडपीठ

By admin | Updated: December 18, 2015 23:47 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीबाबतची जनहित याचिका आणि इतर दोन याचिका न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. आय. एस. चिमा यांच्या खंडपीठात सुनावणीस निघाल्या

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीबाबतची जनहित याचिका आणि इतर दोन याचिका न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. आय. एस. चिमा यांच्या खंडपीठात सुनावणीस निघाल्या असता मनपा आयुक्तांनी समांतर जलवाहिनीसंदर्भात शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश खंडपीठाने आज दिले. याचिकांची पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे. सुनावणीच्या वेळी अ‍ॅड. अनिल गोलेगावकर यांनी मनपा आयुक्तांनी कंत्राटदार औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी यांना ११ डिसेंबर २०१५ रोजी बजावलेली कारणेदर्शक नोटीस न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणली. सदर कंत्राटदारांनी करारानुसार मुदतीत कामे केली नसल्यामुळे त्यांचा करार रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणेदर्शक नोटीस मनपा आयुक्तांनी कंत्राटदारास बजावली आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रा. दिवाण यांचे वकील उदय बोपशेट्टी यांनी मनपा आयुक्तांनीच शपथपत्र दाखल करण्याची विनंती न्यायालयास केली. मनपा आयुक्तांनी यासंदर्भात कारवाई सुरू केल्यामुळे त्यांनीच शपथपत्र दाखल करणे योग्य राहील, असे निर्देश खंडपीठाने दिले. समांतर जलवाहिनीसंदर्भात राजेंद्र दाते पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली असून, विजय शिरसाठ व प्रा. डॉ. विजय दिवाण यांनीसुद्धा यासंदर्भात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अनिल गोलेगावकर व अ‍ॅड. मधुर गोलेगावकर, अ‍ॅड. उदय बोपशेट्टी आणि अ‍ॅड. प्रदीप देशमुख तर महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. नंदकुमार खंदारे, कंत्राटदार कंपनीतर्फे अ‍ॅड. कर्पे आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील भारस्वाडकर हजर होते. तर मनपाचे शहर अभियंता पानझडे, कार्यकारी अभियंता कोल्हे, अभियंता फालक आणि विधि अधिकारी ओ. सी. शिरसाठ सुनावणीच्या वेळी हजर होते.