विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By Admin | Updated: August 6, 2015 00:09 IST2015-08-05T23:36:25+5:302015-08-06T00:09:09+5:30

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही

Advance booking to buy water | विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

 

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे भयाण वास्तव बीड शहरात आहे. सध्या बीडकर आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवित आहेत. एवढेच नव्हे तर हे विकतचे पाणी मिळविण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ करावी लागत असल्याने, सध्या किती भयाण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, याची प्रचिती येते. बीड शहरात सध्या नगर पालिकेकडून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी नागरिकांना अपुरे पडते. दोन ते तीनच दिवसात पालीकेचे आलेले पाणी संपत असल्याने राहिलेले आठ दिवस काढायचे कसे ? असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो. अगोदरच पाऊस नसल्याने सर्व व्यवहान ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याचे दिसते. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेऊन प्यायचे म्हणजे एक अडचणच. पण, ते केल्याशिवाय आता बीडकरांसाठी पर्याय उरलेला नाही. भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन पिण्याची दुर्दैवी वेळ सध्या बीडकरांवर आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. तर माजलगाव धरणातुन माजलगाव, बीड शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी सुद्धा जास्त वेळ टिकेल याची शाश्वती देता येणार नाही, असे प्रशासनाने जाहिर केले होते. त्यामुळे नागरीकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बीडकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अद्यापपर्यंत प्रशासनानेही कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याची सोय करावी, अशी मागणी बीडकरांमधून जोर धरू लागली आहे. बारा महिने विकते पाणी फक्त दुष्काळातच पाणी लागते असे नाही. बाराही महिने काही भागातील नागरीक विकतचे पाणी घेत असल्याचे टँकर चालकाने सांगितले. कोणी बांधकामासाठी तर कोणी पिण्यासाठी पाणी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी महागले उन्हाळ्यात तर पाणी महाग होतेच परंतु पावसाळ्यात याच्या किंमतीत अधिक वाढ झाली. उन्हाळ्यात २०० ते २५० रूपयाला मिळणारे टँकर आता २५० ते ३५० रूपयाला विकत घ्यावे लागत आहे. यावरून उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात पाणी महागाल्याचे स्पष्ट दिसते. जार वाल्यांचा धंदा तेजीत शहरात सध्या दुकानदारांपासून ते कार्यालये व घरामध्ये जार चे पाणी पिण्यासाठी घेतले जात आहे. जार ची किंमतही ३० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत आहे. यावर्षी आजही जार ला अधिक मागणी असून ते वेळेवर मिळणेही मुश्किल बनले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Advance booking to buy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.