शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या १५० शाळा दत्तक

By admin | Updated: April 16, 2016 01:47 IST

औरंगाबाद : तालुक्यातील जवळपास जिल्हा परिषदेच्या १५० शाळा ‘व्हर्च्युअल क्लासरूम’साठी दत्तक घेण्यास जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने अनुकूलता दर्शविली आहे.

औरंगाबाद : तालुक्यातील जवळपास जिल्हा परिषदेच्या १५० शाळा ‘व्हर्च्युअल क्लासरूम’साठी दत्तक घेण्यास जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने अनुकूलता दर्शविली आहे. शिक्षक सेनेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये ई- लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेने सदरील संस्थेकडे ई-लर्निंगसाठी शाळा दत्तक घ्याव्यात म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर मागील आठवड्यात या संस्थेच्या प्रकल्प विभागाचे पाटील व पुराणकर यांच्याशी शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस सदानंद माडेवार यांनी सविस्तर चर्चा केली. तेव्हा व्हर्च्युअल क्लासरूमबाबतचा प्रस्तावही सादर केला होता. या संघटनेने जिल्ह्यात लोकसहभागातून अनेक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूमचे प्रयोग यशस्वी केले आहेत. शिक्षक सेनेची याबाबतची भूमिका लक्षात घेऊन जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यातील १५० शाळा ई-लर्निंगसाठी दत्तक घेण्यास अनुकूलता दर्शविली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरूमला गती देण्यासाठी या संस्थेचे मोठे सहकार्य लाभणार आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून यापूर्वी पैठण व गंगापूर तालुक्यातील सुमारे ५५० शाळांत अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता या संस्थेने औरंगाबाद तालुक्यातील जि. प. शाळांसाठी पुढाकार दर्शविला आहे. या निर्णयाचे स्वागत संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पोलास, सरचिटणीस सचिन एखंडे, प्रवीण लोहाडे, पंकज मंडगे, संदीपान जाधव, चंद्रकांत पालकर, दीपक रंगे, नामदेव हिलाल, गणेश मुळे, अशोक आघाव, भक्तराज कापुरे, अशोक चव्हाण, मनोज वानखेडे, जगदीश परदेशी, शिवाजी चिंतलवाड, अविनाश पाटील, राजेंद्र पाटील आदींनी केले आहे. शिक्षक सेनेच्या माध्यमातून सदानंद माडेवार यांनी शाळांना आवाहन केले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावासोबत मागणी अर्ज, लाईट बिल व संस्थेच्या पूर्वपरवानगीने लोकसहभागातून जमा केलेल्या साडेपाच हजारांचा धनाकर्ष जोडावा लागणार आहे. अर्जाचा नमुना संस्थेच्या बजाजनगर येथील कार्यालयात अथवा शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावा.