शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 19:31 IST

या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यातून जायकवाडी प्रकल्पात रोज पाण्याची आवक होत आहे. आगामी काळातही ही आवक अशीच राहणार आहे. आज जायकवाडी प्रकल्प ८० टक्क्यांच्या पुढे भरला असल्याने वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासन चिंतामुक्त झाले.

मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिले जाते. या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते. गतवर्षी मराठवाडा आणि जायकवाडी प्रकल्पाचा उर्ध्वभाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही कमी पाऊस झाला होता. परिणामी गतवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ५३ टक्केच जलसाठा जमा झाला होता. यामुळे समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी येथील जनतेला अहमदनगर आणि नाशिकविरोधात आंदोलन करावे लागले होते. न्यायालयातही लढा द्यावा लागला होता. यंदाही मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. यामुळे विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडीत आज ८० टक्क्यांच्या पुढे जलसाठा जमा झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील लहान, मोठी धरणे आणि बंधारे शंभर टक्के भरले आहेत. पुढील संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाचा आहे. यामुळे या महिन्यात पावसाचा प्रत्येक थेंब नगर, नाशिककरांना जायकवाडी प्रकल्पासाठी सोडावा लागणार आहे. यामुळे आगामी काही दिवसांतच जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल, असा अंदाज कडाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी वर्तविला.

रब्बी, उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने सोडणारप्रकल्प भरू लागल्याने आम्ही आजपासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर्षी रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने अशा एकूण सात आवर्तनातून सुमारे १५०० दलघमी पाणी सिंचनासाठी देणार आहोत. उद्योग आणि पिण्यासाठी २०० दलघमी पाणी देता येणार आहे. वर्षभरात सुमारे ३०० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा तसेच दोन्ही जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

दहा दिवसांत जायकवाडी शंभर टक्क्यांपर्यंत भरेलजायकवाडीच्या उर्ध्व भागातील सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने नगर, नाशिककर आता पडणाऱ्या पावसाचा एकही थेंब साठवू शकत नाही. यामुळे आगामी काळात उर्ध्व भागातून जायकवाडीत पाण्याची आवक होतच राहील. पुढील दहा ते बारा दिवसांत जायकवाडी शंभर टक्के भरेल.- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊस