शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा एसटीत समावेश करा

By admin | Updated: August 15, 2014 01:35 IST

बीड: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी जोर धरीत असून, गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, अंबाजोगाई, केज, धारुर, शिरुर कासार,

बीड: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी जोर धरीत असून, गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, अंबाजोगाई, केज, धारुर, शिरुर कासार, घाटनांदूर याठिकाणी धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको केला. यामुळे जवळपास दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.अंबाजोगाईत वाहतूक ठप्पमहाराष्ट्र शासनाने धनगर समाजाचा समावेश एस. टी प्रवर्गात करावा, आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्यावा या मागणीसाठी येथील धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी यशवंतराव चव्हाण चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात पुकारलेल्या बंदला शहरवासियांनी संमिश्र प्रतिसाद दिला. या आंदोलनाचे नेतृत्व धनगर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी केले. या आंदोलनात धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शिरुरमध्ये आंदोलनधनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, शिवसंग्राम आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनात डॉ.मधुसूदन खेडकर, शेख फय्याज, वसंत साबळे, सागर केदार, संदीप गाडेकर, रवि आघाव, सागर पाटील, प्रल्हाद धनगुडे, संदीप गाडेकर, रामदास बडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महिलांचा उत्स्फूर्त सहभागधारुर शहरात झालेल्या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजीने शहर दणाणून गेले होते. यावेळी आ. प्रकाश सोळंके, रमेश आडसकर, भाजपा प्रदेश चिटणीस आर.टी. देशमुख यांनी, डॉ. भागवत सरवदे, तुकाराम येवले, अशोक करे सहभागी झाले होते.घाटनांदूरमध्ये मेंढ्या घेऊन आंदोलनघाटनांदूर येथे आंदोलक मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. केज येथेही आंदोलन करण्यात आले. तसेच शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)