आदर्श पतसंस्थेतील घोटाळा; पैसे बुडाल्याच्या तणावात गुंतवणूकदार तरुणाची आत्महत्या
By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:01 IST2023-07-15T19:00:54+5:302023-07-15T19:01:18+5:30
आदर्श पतसंस्थेत ठेवलेली २२ लाख रुपयांची ठेव आता बुडणार या धास्तीत तरुण होता

आदर्श पतसंस्थेतील घोटाळा; पैसे बुडाल्याच्या तणावात गुंतवणूकदार तरुणाची आत्महत्या
करमाड: आदर्श पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्यामुळे आपले पैसे बुडणार या धास्तीने संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथील रामेश्वर नारायण इत्थर (३८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आदर्श पतसंस्थेत ठेवलेली २२ लाख रुपयांची ठेव आता बुडणार या धास्तीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. रामेश्वर यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. आदर्श पतसंस्थेत घोटाळा करणाऱ्या अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यामुळेच ही आत्महत्या झाली असा, आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला. अध्यक्ष मानकापे यांनी घोटाळा करून कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केलेली आहे. ही मालमत्ता शासनाने जप्त करावी, बँकेवर प्रशासक नियुक्त करून मालमत्तेचा लीलाव करत ठेवी परत कराव्यात अशी मागणी खातेधारक करत आहेत.