शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
3
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
4
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
5
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
6
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
7
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
8
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
9
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
10
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
11
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
12
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
13
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
14
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
15
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
16
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
17
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
18
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
19
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
20
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता सुमित राघवणने लाईव्ह फेसबुकवर दाखविली नाट्यगृहाची दूरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 23:40 IST

औरंगाबाद शहरातील नागरिक ओरडून ओरडून थकल्यानंतर आता अभिनेता सुमित राघवणने स्थानिक नाट्यगृहांची अत्यंत दयनीय अवस्था फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला.

औरंगाबाद, दि. - शहरातील नाट्यगृहांची दूरवस्था शतदा समोरून आणूनही मनपा प्रशासन ढिम्म ते ढिम्मच! शहरातील नागरिक ओरडून ओरडून थकल्यानंतर आता अभिनेता सुमित राघवणने स्थानिक नाट्यगृहांची अत्यंत दयनीय अवस्था फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला. शनिवारी (दि.६) एका नाटकाच्या प्रयोगानिमित्त ते शहरात आले होते. प्रयोग सुरू करण्यापूर्वी जेव्हा त्यांच्या नाटकाची टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहचली तेव्हा तुटलेल्या खुर्च्या, मोडलेला रंगमंच, अस्वच्छता, मेक-अप रुमची दूरवस्था, स्वच्छातागृहांची दुर्गंधी अशी विदारक स्थिती पाहून चकीतच झाली. नाटकाच्या रंगमंचाची झालेली विटंबना सहन न झाल्याने त्यांनी लागलीच तेथून फेसबुकवर या सर्व परिस्थितीचे चित्रण लाईव्ह दाखविण्यास सुरूवात केली.तो म्हणतो, ह्यआम्ही कलाकार १२-१२ तास प्रवास करून येथो आलो आणि अशा ठिकाणी आम्हाला प्रयोग करावा लागत आहे. आमच्या महिला कलाकार तर मेक-अप रुममध्ये जाण्यासही तयार नाही एवढी वाईट स्थिती आहे. या व्हिडिओमध्ये मग तो दुभंगलेले स्टेज, कुशन निघालेल्या खुर्च्या, जिकडे-तिकडे पडलेला कचरा, भिंती व दरवाजा मागे थुंकलेले, स्वच्छतागृहातील अस्वच्छता दाखवतो.संत एकनाथ रंगमंदिराला दुर्लक्षित नाट्यगृह संबोधून तो म्हणतो की, ह्यआम्ही जेव्हा येथील कर्मचाºयाला पडलेला कचरा दाखवला तेव्हा त्याने ह्ययावेळेला माणसे मिळत नाही, असे कारण सांगून कचरा उचलण्यास नकार दिला.ह्ण यापूर्वी प्रशांत दामले यांनी स्वत: झाडू मारून नाट्यगृहांच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधले होते. मध्यंतरी शहरातील नाट्यप्रेमी व कलाकारांनीसुद्धा एकत्र येऊन मनपाला नाट्यगृहांबाबत निवेदन दिले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.पुन्हा औरंगाबादमध्ये प्रयोग नाही!ह्यअत्यंत गलिच्छ अशा या ठिकाणी काम करायला धाडस लागतेह्ण अशी उपाहासात्मक टीका करतसुमित राघवण यांनी पुन्हा येथे प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला. आधीच शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत नाही अशी ओरड केली जाते आणि त्यातही जर आता कलाकरांनी येथे न येण्याचा निर्णय घेतला तर शहराच्या नाट्यसंस्कृतीला मोठा धक्का बसेल, अशी भीती नाट्यरसिकांनी व्यक्त केली.शिवसेनेवर साधला निशाणाऔरंगाबाद शहराच्या महापालिकेच्या गलथान कारभारावर टीका करण्यासोबतच त्याने शिवसेनेवरही ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाने रंगभूमीकडे असे दुर्लक्ष करावे याबाबत त्याने आश्चर्य व्यक्त केले. नाट्यगृहाची दूरवस्था दाखवताना त्याने ह्यवाह रे वाह शिवसेनाह्ण अशी उपरोधाने टीका केली. ह्यमी कोणत्या पार्टीच्या विरोधात नाही, पण शेवटी सगळे सारखेच आहेतह्ण, असे त्याने फेसबुकवर कमेंट लिहिली. पालिका प्रशासन हा व्हिडिओ पाहतील आणि नाट्यगृहाकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा राघवण यांनी शेवटी व्यक्त केली.सोशल मीडियात नाच्चकीसुमित राघवणने शेअर केलेला हा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियवर व्हायरल झाला. बातमी लिहितेपर्यंत तो ५८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ९१३ जणांनी शेअरदेखील केला. संगीतकार कौशल इनामदार यांनी राघवण यांचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, सर्व नाट्यरसिकांनी एकत्र येऊन या विरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. मुळात आपण सरकारी मेहरबानीवर अवलंबून न राहता पर्यायी रंगमंचांची निर्मिती करावी.