शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:03 IST

ईएसच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी मानवमुक्ती आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हृद्य सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पीईएसच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी मानवमुक्ती आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी पीईएसचे अध्यक्ष डॉ. एस.पी. गायकवाड हे होते.प्रारंभी महामानवांच्या मूर्तींना अभिवादन केल्यानंतर व बुद्धवंदना झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात आंबेडकरी विचाराला आपल्या जीवनाचे ध्येय मानून जगलेले समता सैनिक म्हणून शाल, सन्मानचिन्ह व बुके देऊन झालेल्या या सत्कारात डॉ. उपगुप्त भन्ते, माजी न्यायाधीश डी.आर. शेळके, अ‍ॅड. एस.आर. बोदडे, प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्राचार्य सर्जेराव ठोंबरे, प्रा. डॉ. सुशीला मूल-जाधव, प्रा. डॉ. स्मिता अवचार, जनार्दन म्हस्के, प्रा. प्रकाश वराळे, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, प्राचार्य डॉ. जे.एस. खैरनार, नाटककार प्रकाश त्रिभुवन, प्रा. डॉ. प्रकाश शिरसाठ, नंदकुमार नाईक, भीमराव सरवदे, सुधाकर झिने, इंजि. बाबूराव आदमाने, डॉ. मिलिंद रणवीर आदींचा समावेश होता. ज्येष्ठ रंगकर्मी त्र्यंबक महाजन, किशोर शितोळे व प्राचार्य डॉ. कल्याण लघाने हे काही अपरिहार्य कारणास्तव सत्कारास उपस्थित राहू शकले नाहीत. प्रा. प्रज्ञा साळवे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. प्रारंभी, महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर साळवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजेंद्र म्हस्के यांनी आभार मानले. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. राठोड, पीईएस पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य टी.ए. कदम, मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ए.पी. गोलकोंडा, मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री घोबले यांची यावेळी उपस्थिती होती. याचवेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक