वर्षभरात साडेबारा हजार वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:50 IST2019-02-18T20:50:34+5:302019-02-18T20:50:48+5:30
गत वर्षभरात वाहतूक नियमाचे उल्लंघंन करुन वाहने चालविणाऱ्या तब्बल साडेबारा हजार वाहनांवर वाळूज वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

वर्षभरात साडेबारा हजार वाहनधारकांवर कारवाई
वाळूज महानगर : गत वर्षभरात वाहतूक नियमाचे उल्लंघंन करुन वाहने चालविणाऱ्या तब्बल साडेबारा हजार वाहनांवर वाळूज वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत वाहधारकांकडून विविध कलमांखाली ३५ लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गत वर्षभरात वाहतुकीचे नियम मोडून नियमबाह्य दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने चालविणाºया तब्बल १२ हजार ५१७ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात वाहतूक पोलिसांनी विविध कलमाखाली संबंधित वाहनधारकांकडून ३५ लाख ३१ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
२९८ वाहनचालकांकडून ६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा दंड न्यायालयात भरला आहे. तसेच १६ हजार १४९ वाहनधारकांची फोटो काढण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी सेफसिटी प्रकल्प यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे, राजेंद्र उदे, संजीव पाटील, सत्यवान बिराजदार, रामेश्वर कवडे, स्वामी, शमशुद्दीन कादरी, रविंद्र कुरेवाड आदींनी केली आहे.