सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:53 IST2019-08-24T23:53:23+5:302019-08-24T23:53:35+5:30
धुम्रपान करणाºया आणि तंबाखूजन्य पदार्थ कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते अशा २३ जणांकडून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर कारवाई
वाळूज महानगर: अन्न व औषधी प्रशासन, गुन्हे शाखा व जिल्हा रुग्णालय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्यातर्फे शुक्रवारी वाळूज महानगरात मोहिम राबवून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाºया आणि तंबाखूजन्य पदार्थ कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते अशा २३ जणांकडून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अन्न व औषधी विभाग, गुन्हे शाखा व जिल्हा रुग्णालय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या पथकाने शुक्रवारी वाळूज महानगरातील बजाजनगर, रांजणगाव परिसरात संयुक्त मोहिम राबविली.
यावेळी पथकाकडून दुकानावर जनजागृती फलक लावून त्यांना मार्गदर्शन केले. ही कारवाई डॉ. अमोल काकडे, फौजदार भंडारी, संतोष सोनवणे, योगेश गुप्ता, रितेश जाधव, नंदलाल चव्हाण, योगेश साळुंके, लक्ष्मीकांत माळगे, प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, योगेश कणसे आदींनी केली.