शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कृती समितीचे धरणे आंदोलन सुरूच

By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST

हिंगोली : वसमत नगरपरिषदेने शहराच्या हद्दीत सर्वे नं. ३९ मध्ये प्रस्तावित केलेला कत्तलखाना रद्द करण्याच्या मागणीसाठी

हिंगोली : वसमत नगरपरिषदेने शहराच्या हद्दीत सर्वे नं. ३९ मध्ये प्रस्तावित केलेला कत्तलखाना रद्द करण्याच्या मागणीसाठी १९ मेपासून वसमत तालुका गोवंश वाचवा कृती समितीने वसमतच्या उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. कृती समितीने उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देऊन नगर परिषदेने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, कमलकिशोर सोनी, गौतम दातार, रामराव बलखंडे, भीमराव जाधव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. जनता दल (सेक्युलर)ने दिलेल्या निवेदनात कत्तलखाना किती एकर क्षेत्रफळात होणार, जमिनीची आर्थिक किंमत, क्षेत्रफळ, त्यात कत्तल होणार्‍या जनावरांची संख्या, शहरापासूनचे कि.मी. मधील अंतर, हवामान व नद्यांच्या प्रदूषणाचे होणारे टक्क्यांमधील वाढीचे प्रमाण यासह नगर परिषदेला होणारे वार्षिक फायदे व किती वर्षे जमीन वापरायची व परतीची मुदत असे असंख्य प्रश उपस्थित केले आहेत. निवेदनावर शहर अध्यक्ष सुभाष अंबेकर, उपाध्यक्ष मुबीन सिद्दीकी, पक्ष संघटक केशव व्हडगीर यांच्या सह्या आहेत. वसमत शहरातील राष्टÑमाता सेवाभावी संस्थेने कृती समितीला पाठिंबा देणारे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांना सादर केले असून नियोजित कत्तलखाना रद्द करण्याची मागणी केली आहे. धरणे आंदोलनकर्त्यास न्याय देण्याची विनंतीही निवेदनात केली आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख मतीन शेख पाशा, सचिव फरजाना बेगम हलीम, शेषराव साळवे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, धरणे आंदोलनास शहर व तालुक्यातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी दिली आहे. वाय.एम. कासार, पांडुरंग देसाई, सय्यदलाल अली, मुंंजाजी आगलावे, गंगाधर आगलावे, दामाजी जाधव, देवानंद नाईवाडे, गंगाधर खंदारे, देवीदास कल्याणकर, लक्ष्मण धुडूम, निसार अहेमद, माजीद आदी नागरिकांनी धरणे आंदोलनास भेट देवून पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)