शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

ट्रक चोरीच्या प्रकरणात फिर्यादी चालकच निघाला आरोपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 7:15 PM

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रक चालक व त्याच्या दोन साथीदारांनी बनाव रचला

ठळक मुद्देपाथर्डी पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल असून ट्रक जप्त असल्याचे सांगितले.फिर्यादी ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार पाथर्डी तालुक्यात चोरीसाठी गेले होते

पैठण : शुक्रवारी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी ट्रक चालकास झाडाला बांधून ट्रक पळवून नेल्याची फिर्याद देणारा फिर्यादी ट्रक चालकच या प्रकरणात आरोपी असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. फिर्यादी ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील रिलायन्स टॉवर च्या बँटऱ्या चोरून नेत असताना पाथर्डी पोलिसांनी पाठलाग केल्याने ट्रक तेथेच सोडून पळून आले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रक चालक व त्याच्या दोन साथीदारांनी बनाव रचून पैठण पोलीस ठाण्यात मारहाण करून ट्रक पळवून नेल्याची फिर्याद दिली होती.

पैठण पाचोड रोडवर गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान  अज्ञात दुचाकी चालकांनी डोळ्यात मिरची टाकून शस्त्राचा धाक दाखवून झाडाला बांधून टाकले व आपला ट्रक पळवून नेला अशी फिर्याद पाचोड येथील ट्रक चालक विशाल दुर्बे याने शुक्रवारी पैठण पोलीस ठाण्यात दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे व पैठण पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी गतीने तपासाची चक्रे फिरवली. ट्रक चालक विशाल याच्या जबानीत वेळोवेळी विसंगती येत असल्याने त्याच्यावर संशय वाढला. पोलीस निरीक्षक फुंदे व देशमुख यांनी विशाल यास विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला.

तीसगावला केली चोरी...पाचोड येथील मिनीट्रक चालक विशाल दुर्बे व त्याचे पाचोड येथील साथिदार मिथुन वर्मा व वैभव वरात यांनी गुरूवारी पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील रिलायन्स टॉवर ची केबीन तोडून केबीन मधील २४ बँटऱ्या काढून ट्रक मध्ये टाकल्या व शेवगाव मार्गे पैठणकडे निघाले दरम्यान त्यांचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने तीघांनीही ट्रक सोडून पलायन केले. शुक्रवारी तीघेही पाचोड येथे भेटले व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी कट रचला.

असा रचला कट पैठण पाचोड रोडवर मारहाण करून चोरट्यांनी ट्रक पळवून नेला अशी फिर्याद दिलीतर आपल्यावर शंसय येणार नाही असे ठरवून त्यांनी कट रचला.शुक्रवारी मिथुन वर्मा व वैभव वरात या दोघानी ट्रक चालक विशाल दुर्भे यास पैठण पाचोड रोडवरील रहाटगाव शिवारातील एका झाडास बांधले, त्याच्या अंगावर मिरची पावडर टाकली. थोड्या वेळाने त्याला सोडले व पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. परंतू घटनाक्रम सांगताना ट्रकचालक गोंधळून गेला व पोलिसांचा संशय खरा निघाला.

पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपैठण पोलिसांनी ट्रकचालकाने दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी पोलीसांना संपर्क साधला असता या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ट्रक जप्त असल्याचे सांगितले.

आरोपी विरुद्ध बी समरी पाठवणारपोलीसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने खोटी फिर्याद दिल्याने या प्रकरणाची बी समरी न्यायालयास पाठविणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले. दरम्यान आरोपी ट्रकचालक विशाल दुर्बे यास पाथर्डी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार असलेल्या मिथुन वर्मा व वैभव वरात यांचा शोध घेण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबाद