पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी बसचा पाठलाग करून केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 19:05 IST2021-03-03T19:04:49+5:302021-03-03T19:05:12+5:30
Kidnapping a Minor girl आरोपी व सदर मुलगी हे नांदेडकडे जाणाऱ्या खासगी बसने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी बसचा पाठलाग करून केली सुटका
गंगापूर : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला गंगापूर पोलिसांनी येडशी उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले आहे. मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील एक कुटुंब काही दिवसांपूर्वीच शहरात मोलमजुरी करण्यासाठी आले होते. २७ फेब्रुवारीला त्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला सिडको महानगर येथील प्रेमकुमार रोडे (रा. देवगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) या आरोपीने पळवून नेले. मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
आरोपी व सदर मुलगी हे नांदेडकडे जाणाऱ्या खासगी बसने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग करत बीडमार्गे येडशी येथे २ मार्चला पहाटे सदर बस थांबवून आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले. त्यांना गंगापूर ठाण्यात आणून मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपीला अटक केली आहे.