तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यापासून बँक अध्यक्षासह आरोपी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:11 IST2019-01-19T23:10:10+5:302019-01-19T23:11:20+5:30
नोकरीच्या आमिषाने तरुणाकडून पैसे घेऊन नोकरी न लावता कामावरून काढून टाकत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधवसह अन्य आरोपी अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन आले; मात्र तेथे ते सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यापासून बँक अध्यक्षासह आरोपी पसार
औरंगाबाद : नोकरीच्या आमिषाने तरुणाकडून पैसे घेऊन नोकरी न लावता कामावरून काढून टाकत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधवसह अन्य आरोपी अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन आले; मात्र तेथे ते सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कृष्णा ऊर्फ किशोर रतनराव चिलघर (रा. संजयनगर) याने १७ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कृष्णाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी १७ जानेवारीला रात्री लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव, त्यांचा मुलगा विक्रांत जाधव, बँकेचे अधिकारी संजय औटी, उमेश दिवे आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंद होताच पोलीस अधिकारी आरोपींना पकडण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले; मात्र ते सापडले नाहीत. अटकेच्या भीतिपोटी आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली. दरम्यान, बँक अधिकारी औटी यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.