वºहाडी घेऊन जाणार्‍या लक्झरीला अपघात

By Admin | Updated: May 26, 2014 00:58 IST2014-05-26T00:55:25+5:302014-05-26T00:58:44+5:30

दैठणा : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने ही बस पलटी होऊन त्यात सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़

Accident of luxury and luxury carrying luxury | वºहाडी घेऊन जाणार्‍या लक्झरीला अपघात

वºहाडी घेऊन जाणार्‍या लक्झरीला अपघात

 दैठणा : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने ही बस पलटी होऊन त्यात सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़ ही घटना २५ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़ कंधार तालुक्यातील पाणभोसी येथील प्रकाश गोविंदराव नाईकवाडे यांचा मुलगा प्रशांत याचा विवाह परभणी येथील प्रियंका कावरे यांच्यासोबत परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात असल्याने पाणभोसी येथील ४० ते ४५ वºहाडी एमएच २६ बी-२९५ या लक्झरी बसने परभणी येथे आले़ लग्न सोहळा आटोपून ही मंडळी परत गावाकडे जात असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीच्या पुलावर लक्झरी बसच्या पुढच्या टायरचे पाटे तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या बसमध्ये जवळपास ४० ते ४५ प्रवासी अडकून पडले होते़ घटनेनंतर दैठणा येथील तुळसीदास नरसिंग तवर, विष्णू भगवान शिंदे, प्रतापसिंग कच्छवे, उत्तम शाहूराव कच्छवे, प्रेमसुख राणाप्रताप बोराळकर, गणेश बळीरामजी कच्छवे, अनंत गणपतराव कच्छवे यांनी गाडीच्या काचा फोडून वºहाडी मंडळींना बाहेर काढले़ त्यानंतर ही माहिती दैठणा पोलिसांना देण्यात आली़ यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने, फौजदार राजेश्वर जुकटे, सुभाष चव्हाण, नागनाथ मुंडे, गोविंद लोखंडे, हनुमान मरगळ यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने परभणी येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले़ जिल्हा रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान घटनेनंतर चालक फरार झाला आहे़ या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यापैकी नऊ जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे़ जखमींची नावे अशी शंकर नाईकवाडे, भगवान कोंडीबा लुगाडे, एकनाथ भोसेकर, पद्माकर सावकार, लक्ष्मण पांडुरंग नाईकवाडे, शिवदास पांडुरंग नाईकवाडे, मुरलीधर शंकरराव, अंकुश रामजी, मल्लिकार्जुन शेटे, सुरेश गोविंद केंद्रे (पेठशिवणी), दिगंबर किरगे, महाविष्णू भानुदास नाईकवाडे, मुरलीधर व्यंकटराव अंभोरे, उमेश नरगिल्ले, केरबा संभाजी बर्गे, शिवाजी श्रीराम नाईकवाडे, शंकर गंगाधर नाईकवाडे, सुभाष भोसेकर, शंकर प्रभाकर नाईकवाडे, मनोहर मुरली नाईकवाडे, शंकर हनुमंता नाईकवाडे, अमिलकंठवार, रामजी वाघमारे, लक्ष्मण नाईकवाडे, बाबूराव गौंड, तुराजी केंद्रे, संतोष नाईकवाडे, शिवराम किरगे, रामा मारोती अंदुरे, मल्लिकार्जुन मारोती स्वामी,शंकर महादेव नरगिल्ली यांचा समावेश आहे़ (वार्ताहर)

Web Title: Accident of luxury and luxury carrying luxury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.