शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्य निवड बारगळली

By admin | Updated: February 16, 2016 23:38 IST

सेनगाव : नगरपंचायतमधील नगराध्यक्ष निवडीपासून सुरू झालेल्या राजकीय कलगीतुरा समित्या स्थापनेच्या बैठकीनंतर स्वीकृत सदस्य निवडीतही पहावयास मिळाला.

सेनगाव : नगरपंचायतमधील नगराध्यक्ष निवडीपासून सुरू झालेल्या राजकीय कलगीतुरा समित्या स्थापनेच्या बैठकीनंतर स्वीकृत सदस्य निवडीतही पहावयास मिळाला. विरोधकांना दोन हात दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी सलग दुसऱ्या बैठकीस गैरहजर राहिले असून, कोरमअभावी मंगळवारी स्वीकृत सदस्य निवडीची बैठक रद्द करावी लागली. उपविभागीय अधिकारी राहुल खांडेभराड यांच्या उपस्थितीत दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठक बोलावली होती; परंतु सत्ताधारी गटाचे सर्व दहा सदस्य गैरहजर राहिले. तर विरोधी काँग्रेस-मनसे गटाचे सात सदस्य उपस्थित होते. कोरमअभावी स्वीकृत सदस्य निवड बैठक रद्द करावी लागली. सत्ताधारी व विरोधी गटाच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य पद येणार होते. परंतु विरोधी गटाच्या वाट्याला एकही पद येवू द्यायचे नाही. या राजकीय खेळीकरिता सत्ताधाऱ्यांनी बैठकीस गैरहजर राहणे पसंद केल्याची चर्चा नगरपंचायत वर्तुळात होती. सत्ताधारी गटाकडून सेनेचे अ‍ॅड. पांडुरंग देशमुख तर विरोधी गटाकडून मनसेचे जिल्हा सचिव संदेश देशमुख यांची नावे स्वीकृत सदस्य पदासाठी दोन्ही गटाच्या वतीने निश्चित झाली होती; परंतु बैठक रद्द झाल्याने प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)