शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वीकृत सदस्यत्व

By admin | Updated: June 6, 2014 01:12 IST

औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत सदस्य गोपाल कुलकर्णी यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे पद मिळविल्याची तक्रार आयुक्त

बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वीकृत सदस्यत्वऔरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत सदस्य गोपाल कुलकर्णी यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे पद मिळविल्याची तक्रार आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महापौर कला ओझा यांच्याकडे करण्यात आली आहे. चार वर्षांनंतर माहिती अधिकारामुळे ही माहिती उजेडात आल्यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर सध्या सत्ताधारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. तर प्रशासनाने १२७ पानांची तक्रार ठेवून घेतली असून, चौकशी करण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. कुलकर्णी यांनी गारखेडा परिसरातील चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र स्वीकृत सदस्य निवडणूक वेळी सादर केले होते. नवीन नियमानुसार सेवाभावी संस्थेवर काम करणार्‍यांना ते पद मिळण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे कुलकर्णी यांनी शिक्षणसंस्थेचा सहा वर्षांपासून सदस्य असल्याचा पुरावा ५ जून २०१० रोजी सादर केला.तक्रारकर्त्याचे मततक्रारकर्ते प्रमोद नरवडे म्हणाले, संबंधित संस्थेच्या आजवरच्या सर्वसाधारण सभांची माहिती अधिकारात माहिती मिळविली असता गोपाल कुलकर्णी हे संस्थेचे सदस्यच नाहीत, असे स्पष्ट होते. आयुक्त डॉ.कांबळे यांना भेटून याप्रकरणी तक्रार दिल्याचा दावा त्यांनी केला.नगरसेवकाचे मत शिवसेना स्वीकृत सदस्य गोपाल कुलकर्णी म्हणाले, हे राजकीय षड्यंत्र आहे. चार वर्षांत तक्रार का केली नाही. संस्थेने माझा ठराव घेतला आहे. त्याची माहिती तत्कालीन आयुक्त, नगरसचिवांनी तपासल्यानंतरच मला पद देण्यात आले. माझ्यावर खोटे आरोप करण्याचा हा डाव आहे. मी सादर केलेले पुरावे खोटे असते तर मागेच कारवाई झाली असती. मी चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचा आजीव सभासद आहे. संबंधित तक्रारकर्त्याने संस्थाचालकास धमक्या दिल्या. दबाव आणून त्यांच्याकडून काहीही वदवून घेतले असेल. संबंधित संस्थेला १८ मार्च २००५ रोजी सहायक धर्मादाय आयुक्तांकडून पहिले प्रोव्हिजनल सर्टिफिकेट देण्यात आले व अंतिम प्रमाणपत्र २६ मे २००५ रोजी देण्यात आले. त्यामुळे २०१० च्या जून महिन्यात संस्थेला पाच वर्षांचा कालावधी होतो. मग कुलकर्णी यांनी सहा वर्षांपासून सदस्य असल्याचा दिलेला पुरावा खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे. संस्थेच्या चेंज रिपोर्टमध्ये २००५ पासून २०१५ पर्यंत व निवडणुकीमध्ये कुलकर्णी यांचा कुठेही उल्लेख नाही. संस्थेने ते सभासद असल्याचा कोणताही ठराव घेतलेला नाही. कुलकर्णी यांनी जे शपथपत्र दाखल केले व जो आॅडिट रिपोर्ट दाखल केला त्याचा धर्मादाय आयुक्तांकडे कोणताही दाखला नाही. सदरील कागदपत्रे बनावट बनविलेली असल्याचे आढळते. नियमानुसार शासनाची, मनपाची व शैक्षणिक संस्थेची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रमोद नरवडे पाटील यांनी तक्रारीत केली आहे. आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षआयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, तक्रारीवर आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. महापौरांकडेही तक्रार महापौर कला ओझा म्हणाल्या, तक्रार केली असेल ते माहिती नाही. माझ्याकडे तरी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही.