शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बदलाचा स्वीकार करा - टोपे

By admin | Updated: December 21, 2014 00:06 IST

जालना : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी पिढी निर्माण करते असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी मत्स्योदरी पुरस्कार वितरण प्रसंगी शनिवारी मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित

जालना : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी पिढी निर्माण करते असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी मत्स्योदरी पुरस्कार वितरण प्रसंगी शनिवारी मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्यात केले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राने नवा बदल स्वीकारावा असे आवाहनही केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेद्वारे मराठवाड्यातील शिक्षण विषयक कार्य करणाऱ्या प्राध्यापक, साहित्यिक, संशोधक यांना त्यांच्या कार्याबद्दल दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.आर.एस.सोळुंके यांना प्रदान करण्यात आला. ११ हजार रू. रोख, स्मृतीचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल सेवा पुरस्काराचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुशराव टोपे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना टोपे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेने येवू घातलेल्या नव्या बदलाचा शिक्षण क्षेत्राने स्वीकार करावा. मत्स्योदरी शिक्षण संस्था परिवर्तन व बदल याचा नेहमीच स्वीकार करते असेही टोपे म्हणाले. पुरस्काराचे मानकरी डॉ. आर. एस. सोळुंके यांनी सत्काराला उत्तर देतांना सद्यस्थितील शिक्षण व्यवस्थेला बदलाची परिवर्तनाची गरज असून अध्ययन व अध्यापनांचे तरूण पिढीवर संस्कार रूजविता येतात ही शिक्षकांची जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर प्रमुख वक्ते प्राचार्य शिवाजीराव देवडे यांनी जीवन जगतांना सत्याचा मार्ग शिक्षकांनी अवलंबिला पाहिजे, आपला देश सर्व सामान्यांचा व श्रमकऱ्यांचा देश आहे, त्यांनाही कर्मकांडांनी ग्रासले आहे, या कर्मकांडाचे अडथळे शिक्षण क्षेत्रातही आहेत ते दूर व्हावे यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न झाले पाहिजे.आपल्या अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड.टोपे म्हणाले की, शिक्षकांनी मिळणाऱ्या अध्ययन अध्यापन कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांना पुरेपुर कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर.गायकवाड, प्रा.डॉ.राजेंद्र गायकवाड, प्रा.डॉ.भागवतराव कटारे, श्रीरंग पैठणे, राजेश राऊत, अ‍ॅड.राधाकृष्ण गायकवाड, डॉ.शेंडगे, डॉ.संजय शिंदे, संभाजी पाटील, प्रा.मोरे, डॉ.अरूण तवार, धोपटे यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.कार्तिक गावंडे तर आभार डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)