शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

मराठवाड्यातील रस्ते भूसंपादन प्रक्रियेला वेग द्या : विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 14:41 IST

मराठवाड्यातील भूसंपादनांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून रस्ते बांधणीतील अडथळे दूर करा

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागातील दळणवळण पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआयमार्फत कामे

औरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ते बांधणीची कामे वेगाने सुरू असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व रस्त्यांच्या कामांचा आणि प्रलंबित भूसंपादन प्रकरणाचा आढावा घेतला. भूसंपादनांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून रस्ते बांधणीतील अडथळे दूर करण्याच्या सूचना त्यांनी महसूल यंत्रणेला केल्या. 

विभागात काही ठिकाणी मोजणी, निवाडे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठवाड्यात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी तीन प्रमुख यंत्रणाच्या माध्यमातून रस्ते बांधले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते होत आहेत. त्यामध्ये अर्धापूर ते हिमायतनगर ६४ किमी, बारसगाव रहाटी ५२ किमी, भोकर ते सरसम ३२ किमी रस्त्याचे भूसंपादन होणार आहे. तर सरसम ते कोठारी ५७ किमी, कोठारी ते धनोडा ५६.८ किमी, उस्मानगर ते कुंद्राल ५२.०७ किमी, कुंद्राल ते वझर ४६.५२ किमी तर नांदेड ते जळकोट ६५.९५ किमीचे रस्ते होणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग ते अक्कलकोट ३९.८२ किमीचा रस्ता होणार आहे, तर लातूर जिल्ह्यात रेणापूर फाटा ते पानगाव २०.२ किमीचा रस्ता होणार आहे, तर लातूर ते रेणापूर फाटा २१.७५ किमी जळकोट ते टोंगरी ४५.५५ हा रस्ता होणार असून, भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. बैठकीला पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, एमएसआरडीसीचे साळुंके, एनएचएआयचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्ता पूर्ण होणारऔरंगाबाद ते सिल्लोड तसेच पैठण-शिरुर हा ११.२० किमीचा रस्ता होणार आहे. सिल्लोड ते फर्दापूर हा ३२.६३ किमी रस्ता होणार आहे, तर जालना जिल्ह्यात भोकरदन ते हसनाबाद ६६ किमीचा रस्ता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बीड जिल्ह्यात शिरूर ते पैठण रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. तसेच शिरूर ते खर्डा ४२.५ किमी, लोखंडी सावरगाव ते रेणापूर फाटा ३८.२७ किमी, खरवंडी ते राजुरी ६.३० किमीचा रस्ता होणार आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग