शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्ये ६० हजारांची लाच घेताना दोन खासगी इसम अटकेत, अपर तहसीलदार फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:21 IST

छत्रपती संभाजीनगरात अपर तहसीलदारांसाठी ३ लाखांची लाचेची मागणी; खाजगी सहाय्यकाने पार्किंगवाल्याकडे देण्यास सांगितली रक्कम

छत्रपती संभाजीनगर : येथील तहसील कार्यालयात जमिनीच्या क्षेत्रदुरुस्तीसाठी अपर तहसीलदारांसाठी ३ लाखांची लाच मागून त्यातील ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी, १५ मे रोजी रंगेहाथ पकडले. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अपर तहसीलदार  नितीन गर्जे फरार आहे. 

तक्रारदाराने आपल्या मुलाचे आणि नातेवाईकांचे प्लॉट मिटमिटा येथे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रदुरुस्ती संदर्भात डिसेंबर २०२४ पासून पाच फाईल्स तहसील कार्यालयात प्रलंबित होत्या. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान, काम त्यांच्या बाजूने लावण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे १३ मे रोजी तक्रार दाखल केली. पडताळणीमध्ये तक्रारदाराला आरोपी अपर तहसीलदार नितीन गर्जेचा खासगी सहाय्यक नितीन चव्हाण याने पाच फाईल्ससाठी एकूण ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दर फाईल ६० हजार इतकी रक्कम मागितली गेली होती.

या लाचेची रक्कम तक्रारदाराने स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर, एसीबी पथकाने १५ मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी नितीन चव्हाण याने लाच घेतली नाही, मात्र ती रक्कम तहसील कार्यालय परिसरात पार्कींगचे काम पाहणाऱ्या सोहेल जुबेर बहाशवान याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही रक्कम सोहेलकडे दिली. यावेळी इशारा मिळताच सोहेलला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर पथकाने चव्हाण यास देखील ताब्यात घेतले. तर अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पो. उप अधिक्षक सुरेश नाईकनवरे, पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे यांच्या नेतृत्वात पोह राजेंद्र जोशी, पोअं अनवेज शेख यांच्या पथकाने केली.

पार्किंगवाल्याकडे देण्यास सांगितली रक्कमया लाचेची रक्कम तक्रारदाराने स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर, एसीबी पथकाने १५ मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी नितीन चव्हाण याने लाच घेतली नाही, मात्र ती रक्कम तहसील कार्यालय परिसरात पार्कींगचे काम पाहणाऱ्या सोहेल जुबेर बहाशवान याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही रक्कम सोहेलकडे दिली. यावेळी इशारा मिळताच सोहेलला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर पथकाने चव्हाण यास देखील ताब्यात घेतले. तर अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार झाला आहे.

आरोपींकडे महागडे मोबाईलतपासणीत पथकाने आरोपी नितीन चव्हाणकडे एक आयफोन, एक मोबाईल आणि ७५ हजार रोख रक्कम सापडली. तर आरोपी सोहेल बहाशवानकडे एक सॅमसंग एस २२ मोबाईल आणि लाचेचे ६० हजार रुपये सापडले. या प्रकरणात अपर तहसीलदार नितीन गर्जे याने लाच मागणीसाठी खासगी इसमाला सांगितल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी नितीन चव्हाण व सोहेल बहाशवान यांच्यावर कलम ७ए अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत असून, पोलीस स्टेशन सिटी चौक, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग