शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पैठण रोडवरील अतिक्रमण काढण्यास विरोध, पोलीसांसह मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ

By राम शिनगारे | Updated: November 17, 2022 20:04 IST

पोलिसांसह अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद : कांचनवाडी, पैठणरोड येथील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासह पोलीस अधिकाऱ्यांना प्रचंड शिवीगाळ केल्याची प्रकार बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्यांसह दहा जणांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा सातारा ठाण्यात नोंदविला आहे.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार; आयुक्तांच्या आदेशानुसार कांचनवाडी परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी पथकातील वसंत भोये, रामेश्वर सुरासे, पोलीस निरीक्षक फईम हश्मी यांच्यासह कर्मचारी गेले होते. कांचनवाडीतील उड्डाणपुलाखाली वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या पान टपऱ्यांसह इतर दुकाने पथकाने काढली. खुर्च्या, टेबलांसह इतर साहित्य जप्त केले. त्यावेळी टपरी चालक सतीश भालेराव याने विरोध करीत हुज्जत घातली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता मोहित त्रिवेदी याने जमावाला उचकविले व जप्त साहित्य गाडीतून काढले. पथकातील अधिकारी समजावून सांगताना मोहित व सुमीत त्रिवेदी यांनी इतरांना घोषणाबाजी करण्यास लावून पोलिसांसह अधिकाऱ्यांना प्रचंड शिवीगाळ केली.

याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशावरून सहायक आयुक्त सोनवणे यांच्या तक्रारीनुसार मोहित व सुमित त्रिवेदी या भावांसह सतीश भालेराव, विनोद कारके याच्यासह ३ ते ४ पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

त्रिवेदीकडून महिलेचीही फसवणूकगजानन महाराज मंदिर परिसरातील ओम शिवसाई टॉवर येथे शीला पानझाडे यांनी २०१४ मध्ये जीम सुरू केले होते. त्यासाठी पानझाडे तब्बल ७५ हजार रुपये दरमहा भाडे देत होत्या. हे टॉवर सुमीत त्रिवेदी याच्या मालकीचे असून, जीमच्या व्यवसायात पार्टनर करण्यासाठी त्याने दबाव आणला, मात्र पानझाडे यांनी नकार दिल्यानंतर त्यांना त्रास देणे सुरू केले. त्यांच्या जीममधील ३६ लाख १५ हजार ८८५ रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी त्रिवेदीच्या घरी छापा मारल्यानंतर जीममधील एसीसह इतर साहित्य सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयात केल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि. शेषराव खटाणे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी