शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड बाजार समितीचे ३ कोटी थकले

By admin | Updated: May 12, 2015 00:54 IST

श्यामकुमार पुरे , सिल्लोड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३४ गाळेधारकांकडे

श्यामकुमार पुरे , सिल्लोडसिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३४ गाळेधारकांकडे दोन कोटी ६७ लाख ७ हजार ८९० रुपये गाळे भाडे थकले आहे़ त्वरित ही रक्कम न मिळाल्यास लिलाव झालेल्या गाळ्यांचा फेरलिलाव करण्यात येर्ईल, अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती ठगन भागवत यांनी दिली आहे़ विशेष म्हणजे तीन वर्षांपासून गाळेधारकांवर कार्यवाही का करण्यात आली नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे़ २०१२ मध्ये सिल्लोड शहरातील २३ गाळ्यांचा लिलाव झाला होता, तर अजिंठा येथील ४ गाळ्यांचा लिलाव २०१० मध्ये झाला होता. भराडी येथील ७ गाळ्यांचा लिलाव २०११ मध्ये झाला होता़ अशा एकूण ३४ गाळ्यांचा लिलाव करण्यात आला होता. शासनाच्या योजनेतून बाजार समितीला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हे गाळे बांधण्यात आले होते. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना व बाजार समितीचे लायसन्सधारकांना हे गाळे भाड्याने द्यावे असे शासनाचे आदेश आहे; पण यावेळी गाळे लिलाव करताना नियम पाळले गेले नाही आणि धनदांडग्यांना हे गाळे देण्यात आले. या लोकांनी तीन वर्षांपासून लिलावाची रक्कम भरली नाही. त्या गाळ्यांचा लिलाव झाला. बोली बोलणाऱ्यांना ते गाळे ताब्यात देण्यात आले खरे; पण यापैकी बऱ्याच गाळेधारकांनी लिलावात बोललेल्या बोलीची रक्कम बाजार समितीत भरली नाही. ज्या लोकांनी गाळे घेतले त्यापैकी बऱ्याच गाळेधारकांनी या गाळ्यात दुकाने सुरून करता पोटभाडेकरूंना दुकाने दिली.त्यांच्याकडून भाडे वसुली करूनदेखील काही गाळेधारकांनी बाजार समितीचे भाडे लिलावाची रक्कम भरली नाही. यामुळे दोन कोटी ६७ लाख ७ हजार ८९० रुपये थकले.